लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात युवा, रोजगार, मजूर, महिलांना १ लाखांची मदत, शिक्षण, शेतकऱ्यांना एमएसपीची हमी यासह ३० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याबरोबरच शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या धर्तीवर एमएसपी आणि गॅस सिलिंडर ४५० रुपयांमध्ये देण्यात येईल, असे सांगितले आहे. आता काँग्रेसच्या या जाहीरनाम्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते ॲड. आशिष शेलार यांनी टीका करत काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन म्हणजे लबाडाघरचे जेवण असल्याचा टोला लगावला आहे.

आशिष शेलार काय म्हणाले?

“काँग्रेसचा फसवेगिरीचा धंदा सुरु झाला असून काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील खोटेपणा आता स्पष्ट होऊ लागला आहे. ४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देऊ सांगणाऱ्या काँग्रेसने ज्या राज्यात त्यांचे सरकार आहे त्या राज्यात त्यांनी गॅस सिलेंडरचा एक रुपयाही कमी केला नाही. त्यांचे सरकार असणाऱ्या राज्यातदेखील पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले नाही. कर्नाटकसह ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे, तेथे गॅस सिलेंडरवरील सबसिडी सरकारने भरावी, अशा पद्धतीचा निर्णय केला नाही. त्यामुळे काँग्रेसचे हे आश्वासने म्हणजे लबाडाघरचे जेवण होय”, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला.

Vishwajeet Kadam Vishal patil Mallikarjun Kharge
विशाल पाटील सांगली लोकसभेत बंडखोरी करणार? विश्वजीत कदम म्हणाले…
Kirit Somaiya shinde fadnavis
“या सरकारमध्येही घोटाळा होणार होता, पण…”, सोमय्यांचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर; भाजपावरही आरोप
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

हेही वाचा : निवडणुकीत ‘लक्ष्मी’ स्वीकारा आणि मतदान करा, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचे वादग्रस्त वक्तव्य

“नाना पटोले हे एका पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे ते निर्बुद्ध नसतील असे आम्हाला वाटत होते. पण संवेदनशीलतेचा कळस त्यांनी गाठला. एक व्यक्ती स्वत:च्या जीवनाची लढाई लढत आहेत आणि नाना पटोले हे त्याबद्दल राजकारण करत आहेत. अशा पद्धतीचे राजकारण फक्त काँग्रेस आणि नाना पटोले यांनाच शोभू शकते”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

ठाकरे गटाच्या २०० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

“अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या २०० शिवसैनिकांनी आज भाजपात प्रवेश केला. यामध्ये विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी आशिष शेलार बोलत होते. ते म्हणाले, “ठाकरे गटाने विचारधारा जेव्हापासून सोडली, तेव्हा पासून हिंदुत्वावादी शिवसैनिकांची घुसमट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करुन आज अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. त्यांना भाजपात चांगले पद आणि मानसन्मान मिळेल”, असेही आशिष शेलार म्हणाले.