राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येताच नंदुरबार, सातारा आदी ठिकाणांहून अनेकांनी कॉंग्रेसमधून भाजपत प्रवेश केला. तर, महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांनी आपल्या मुलांना राजकारणात आणण्याकरिता ही यात्रा वापरल्याची, टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
हेही वाचा- “पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं होतात” म्हणणाऱ्या राजन पाटलांचा चित्रा वाघ यांनी घेतला समाचार; म्हणाल्या…
विरोधकांवर हल्ला चढवताना बावनकुळे म्हणाले की, भाजपा मताचे दान घेऊन विकास साधणारा पक्ष आहे. तर, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष मतांचे दान घेऊन पळून जाणारे भ्रष्टाचारी पक्ष आहेत. मतदारांनी पंजाचे बटण दाबले, तर देशात दुराचार, भ्रष्टाचार, काळा पैसा व काळ्या पैशापासून सत्ता येईलही, पण पुन्हा हे सत्ताधारी पाच वर्षे गायब होतात हे जाणून घ्या. दुसरीकडे कमळाचे बटण दाबल्यास भारत हा जगातील सर्वात मोठा देश होऊ शकतो. तुमच्या मताचे कर्ज घेऊन भाजप प्रचंड विकासकामे करीत आहे. विकासकामांमधून आम्ही मतांचे दान व्याजासह परतफेड करीत आहोत. लोकांनी घड्याळालाही मते दिली. परंतु, हा पक्ष समाजाकडे लक्ष देत नाही. तर, भाजप समाजाच्या उद्धारासाठी आहे. तसेच सर्व समाज घटकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहत आहे. आपण लोकांची गाऱ्हाणे ऐकून घेत असून, त्यांच्या समस्या, अडचणी सत्तेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही बावनकुळे यांनी दिली.
हेही वाचा- राज्यभर दोन दिवसीय लाक्षणिक ‘ऊसतोड बंद’ आंदोलन; राजू शेट्टी यांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरील अटकेच्या कारवाईबाबत बोलताना तो कायद्याचा भाग आहे. तक्रारीचे स्वरूप, तेथील चित्रीकरण, सीसीटीव्हीचे फुटेज या माध्यमातून ठोस पुरावे असल्याने पोलिसांनी कारवाई केलेली असेल. आव्हाड नेहमीच आरेरावीच्या वातावरणात असतात. अरेरावी जणू त्यांचे काम आहे. कायदा सर्वांना एक सारखा लागू आहे. कायद्यासमोर कोणी मोठा नसल्याचे बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा- “एकनाथ शिंदे ५० नव्हे तर २०० खोके देतात…” आपल्याच आमदाराचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचं विधान
सध्याचे राज्य सरकार कोसळणार असे उध्दव ठाकरे सतत म्हणत असल्याकडे लक्ष वेधले असता ठाकरेंना आता उरले-सुरले आमदार खासदारही दूर जाऊ नयेत म्हणून असे वक्तव्य करावे लागत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसही सत्तेशिवाय राहू शकत नसल्याने त्यांच्यात फुट पडणार आहे. या विरोधकांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे पळापळ होणार असून, लवकरच प्रचंड संख्येने आमच्याकडे येणाऱ्यांचा ओघ राहणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. भाजपeच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून, ते पक्ष वाढीसाठी जीवाचे रान करीत आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्याची त्यांच्यात धडपड आहे. सातारा जिल्ह्यात आमचे नेते व कार्यकर्ते प्रभावी व संस्कारक्षम असल्याचा अभिमान आहे असे समाधान बावनकुळे यांनी व्यक्त केले.