तीनशे वर्षांपासूनची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ घटमांडणीच्या भाकितानुसार यंदा पाऊस सर्वसाधारण राहणार आहे. जनतेला दुष्काळाला सामोरं जावं लागणार नाही. शेतकऱ्याचं उत्पादनही सर्वसाधारण राहील. तसंच शेतमाल बाजार फारसे बदलणार नाहीत. शेतमालाच्या भावात खूप तेजी संभवत नाही, असेही या भविष्यवाणीत म्हटले आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळची भविष्यवाणी प्रसिद्ध आहे. पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक व सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी विदर्भासह संपूर्ण राज्यात प्रसिध्द असलेली भेंडवळची घटमांडणी दरवर्षीप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर संध्याकाळी झाली. गुरुवारी सकाळी भविष्यवाणी जाहीर झाली आहे. शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारणच राहिल, असे भाकित भेंडवळच्या भविष्यवाणीत वर्तवण्यात आले आहे.

kolhapur lok sabha election 2024 marathi news
प्रचाराची पातळी खालावल्याने कोल्हापूरच्या प्रतिमेला छेद
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?

पावसाचा अंदाज काय?
भेंडवळच्या भविष्यवाणीत चार महिन्यांचे भाकित वर्तवण्यात आला आहे. जूनमध्ये साधारण पाऊस होईल. तर जुलैमध्ये जूनपेक्षा जास्त पाऊस आणि ऑगस्टमध्ये पुन्हा साधारण पाऊस होईल. पाऊस कमी आणि लहरी राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शेतीबाबतचे भाकित काय?
कापूस -उत्पादन सर्वसाधारण
ज्वारी – सर्वसाधारण मात्र भावात तेजी शक्य
बाजरी – उत्पादन चांगले
तूर – साधारण पीक
मूग – साधारण पीक पण भाव तेजीत राहतील.
हरभरा – साधारण पीक
उडीद – साधारण पीक
तीळ – मोघम स्वरुपाचे उत्पादन
भादली – रोगराई राहिल
गहू – साधारण उत्पादन होईल
वाटाणा – सर्वसाधारण उत्पादन