बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव – जालना महामार्गावर एका भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय. बोलेरो गाडी आणि ट्रकच्या भीषण धडकेमध्ये पाच प्रवासी जागीच ठार झालेत. या अपघातामध्ये अन्य चार जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. शेगावमधील गजानन महाराजांच्या दर्शनासाठी हे भाविक जात असतानाच हा अपघात झालाय.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बोलेरो गाडी भाविकांना घेऊन जालन्यामधून शेगावला निघाली होती. त्याचवेळी पहाटे साडेपाचच्या सुमारास या गाडीला देऊळगावजवळ खामगाव-जालना मार्गावर भीषण अपघात झाला. बोलेरो गाडी आणि ट्रकने समोरासमोर धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की बोलेरोमधील ९ जणांपैकी पाचजण जागीच ठार झाले. गाडीचा ट्रकला धडक देणारा पुढील भाग पूर्णपणे उद्धवस्त झालाय. मृतांमध्ये गाडीच्या चालकाचाही समावेश आहे.

अपघातामध्ये अर्जुन जयवंतराव पाडमुख (६०), कांताबाई अर्जुन पाडमुख (५५), श्रीमंत अर्जुन पाडमुख (४५, तिघेही रा. रोहनवाडी) कपिल अर्जुन गायकवाड (३२, रा. देवडे हातगाव) आणि जीपचा चालक आकाश गरीबदास लिहिणार (२७, रा. काटखेडा ता. अंबड) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आम्रपाली विठ्ठल पाडमुख (३५), मिनाबाई श्रीमंत पाडमुख (३५), अशोक गरीबदास लिहिणार (२६) मीराबाई परमेश्वर बाळराज (४०), तुकाराम बाबुराव खांडेभराड (४०), बाबुराव श्रीपत कापसे (५०), परमेश्वर कचरूबा बाळराज (३९, सर्व रा. रोहनवाडी) हे सात जण गंभीर जखमी झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातानंतर आरोग्यसेवेच्या १०८ या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका यंत्रणेला माहिती देण्यात आली. देऊळगावराजा येथील रुग्णालयात जखमी व मृतांना दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले.