नाशिक-पुणे मार्गावरील बोटा शिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तरुण जोडप्याचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
बोटा गावाजवळून वाहणाऱ्या कच नदीच्या पुलालगत असलेल्या एका शेतातील खड्डय़ात काहीतरी जळत असल्याचे गावकऱ्यांना दिसले. जवळ जाऊन पाहिले असता ते जोडप्याचे मृतदेह असल्याचे लक्षात आल्याने एकच खळबळ उडाली. शेतमालक सरपंच धोंडिभाऊ शेळके यांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी पोलिसांना कळविले. संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक अजय देवरे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. दोन्ही मृत अंदाचे २४ ते ३० वयोगटातील असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान मृतदेह नेमके कोणाचे, त्यांनी आत्महत्या केली की घातपात झाला असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2015 रोजी प्रकाशित
संगमनेरमध्ये जोडप्याचे जळालेले मृतदेह आढळले
नाशिक-पुणे मार्गावरील बोटा शिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तरुण जोडप्याचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे
Written by लोकसत्ता टीम
First published on: 31-12-2015 at 02:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burn bodies found in sangamner