पुण्याच्या मावळमध्ये हॉटेल व्यवसायिकाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे सामान्य नागरिकांच्या आणि व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या आठवड्यात पिंपरी मधील साबण व्यापाऱ्याची २ लाख रुपयांसाठी हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही घटना ताजी असतानाच आता मावळमध्ये हॉटेल व्यावसायिकाची बेदम मारहाण करत अज्ञात इसमानी हत्या केली. योगेश प्रभाकर पगडे अस या हॉटेल व्यवसायिकाचे नाव आहे. अधिक तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश प्रभाकर पगडे (३३) यांची अज्ञात इसमानी बेदम मारहाण करून हत्या केली. योगेश हे हॉटेल व्यावसायिक होते. त्यांच्या अंगावर मारहाणीचे व्रण आणि जखमा आढळून आल्या आहेत.

त्यानंतर मृतदेह हा त्यांच्याच घराशेजारी असलेल्या रस्त्यावर फेकून दिला. ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडली असून पहाटे योगेश यांच्या भावाला माहिती मिळाली त्यानंतर मयत योगेशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तोपर्यंत योगेश यांचा मृत्यू झाला होता. अद्याप या हत्येमागील कारण अस्पष्ट आहे. अधिक तपास वडगाव पोलीस करत आहेत.

दोन दिवसांपूर्वीच एका अज्ञात अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह रस्त्याच्याकडेला फेकण्यात आला होता. या तिन्ही घटांमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. पिंपरी येथे झालेल्या साबण व्यापाऱ्याच्या मारेकऱ्याला पोलिसांनी काही तासातच जेरबंद केलं होतं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Businessman murder in pune
First published on: 12-05-2018 at 14:17 IST