लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : पुण्यात मोक्याच्या ठिकाणी स्वमालकीचा मोठा भूखंड खरेदी करून देण्याचे आमीष दाखवून आणि विश्वास संपादन करून नोटरी करार करून सात कोटींची रक्कम घेतली. परंतु नंतर भूखंड खरेदी करून न देता चुलत बहिणीने व तिच्या पतीने फसवणूक केल्याची फिर्याद एका उद्योजकाने सोलापुरात सदर बझार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका
sangli crime news, cloroform for md drugs marathi news
सांगली: तासगाव तालुक्यातील शेतात ११ लाखांचे द्रवरुप क्लोरोफार्म जप्त, एमडीसाठीचा कच्च्या मालाचा साठा

मनोज कांतीलाल शहा (वय ५५, रा. सिव्हील लाईन्स, सात रस्ता, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची चुलता बहीण मंजुषा ईश्वर परमार आणि तिचा पती ईश्वर चंदूलाल परमार (रा. परमार पॅरॉडाईज, वूड लॅन्ड हॉटेलाशेजारी, लष्कर, पुणे) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. दि. १८ ऑगस्ट २०२३ ते २४ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत सोलापुरात गांधी नगरातील हेरिटेज लॉनवरील मनोज शहा यांच्या कार्यालयात हा फसवणुकीचा प्रकार घडला.

आणखी वाचा-लाचखोरीच्या प्रकरणात दोन सहाय्यक अभियंते जेरबंद, रायगड जिल्हापरिषदेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर

सोलापुरात मनोज शहा यांच्या मालकीचे हेरिटेज लॉन नावाचे मोठे मंगल कार्यालय असून याशिवाय इतर उद्योग आहेत. त्यांची चुलत बहीण मंजुषा व तिचे पती ईश्वर परमार यांनी मनोज शहा यांची भेट घेऊन पुण्यातील साधू वासवानी चौकात त्यांच्या मालकीचा मोठा भूखंड विकायला काढल्याचे सांगून ती भूखंड विकत घेण्याबाबत प्रस्ताव ठेवला. मात्र १० हजार ९५२ चौरस फूट आकाराचा हा भूखंड वादग्रस्त असताना त्यातील काही भाग परमार ट्रेडिंग सेंटर व परमार गॅलेक्सीच्या नावाने भूखंड आराखड्यात समाविष्ट असल्याचे सांगून परमार दाम्पत्याने या भूखंडाचा सौदा मनोज शहा यांच्याबरोबर निश्चित करून त्यापोटी नोटरी करार केला. शहा यांनी भूखंड खरेदीपोटी बँक खात्यातून परमार दाम्पत्याला सात कोटींची रक्कम पाठविली. परंतु नंतर संबंधित भूखंड केवळ ५७० चौरस फुटांचा असल्याचे आढळून आले. ठरल्याप्रमाणे परमार दाम्पत्याने भूखंड खरेदी करून दिला नाही आणि घेतलेली सात कोटींची रक्कमही परत केली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक अजित लकडे हे पुढील तपास करीत आहेत.