नागपूरमध्ये टायर फुटल्याने कारचा भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या अपघातात पाच महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचाही समावेश आहे.
नागपूरमधील हिस्लोप कॉलेजचे विद्यार्थी फिरायला बाहेर गेले होते. तिथून परतत असताना नागपूर- अमरावती महामार्गावर वडधामनाजवळ कारचा टायर फुटला. यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. विशाल रथवानी (चालक), निशा निकम (२१), मैत्री आवळे, सत्या (२०), धीरज (२०) अशी मृतांची नावे आहेत. तर तीन जण या अपघातात गंभीर जखमी झाले. जखमींवर मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निशा निकम हीचे वडील पोलीस खात्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. या घटनेमुळे महाविद्यालयात शोककळा पसरली आहे.