महाडपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नडगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर काल संध्याकाळी एका मोटारसायकल स्वाराला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या इंडिका कारने धडक दिल्याने मोटारसायकल स्वारासह दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर कारचालक फरारी असून एमआयडीसी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
महाड एमआयडीसीकडे मुंबई-गोवा महामार्गावरून सागर प्रभाकर साटम हे मोटार सायकल क्रमांक एमएच-०६/बीसी-३८२७ जात असताना समोरून भरधाव वेगाने येत असलेल्या इंडिका कारची धडक मोटारसायकलला बसल्याने अपघात घडला. घटनेनंतर इंडिकाचा चालक फरारी झाला. अपघातात मोटारसायकलवरून एमआयडीसीकडे जात असलेला सागर साटम, कु.भाग्यश्री चोपडे (१५) रा.बिरवाडी कुंभारवाडा व कु.के. अर्चना कार्तिकेयन (९) रा.इ.बीपीएल कंपनी कॉलनी महाड या दोघींना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.