अवधान शिवारातील शेतजमीन विक्री करण्याच्या नावाखाली नाशिकसह धुळ्यातील सात संशयितांनी व्यापाऱ्यास तब्बल ५० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय काशिनाथ अग्रवाल (रा. रामवाडी, मालेगावरोड, धुळे) यांनी याबाबत तक्रार दिली. खोटे व बनावट दस्तावेज तयार करून अवधान येथील शेती गट क्रमांक ७३/१ एकूण क्षेत्र ९१ आर ही जमीन विकण्याचा बनाव निर्माण करून २६ मे २०१३ पासून संशयितांनी वेळोवेळी ५० लाख ५१ हजार रुपये लुबाडले, मात्र शेती नावावर न करता फसवणूक केली. या तक्रारीवरून पोलिसांनी पद्मा अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल, क्षितिज अग्रवाल, भारती बापट, माधव बापट (सर्व रा. धुळे) तसेच अजीज श्रीविजय गोखले, नंदकिशोर अवधूत आधारकर (रा. नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jun 2016 रोजी प्रकाशित
शेतजमिनीच्या व्यवहारात फसवणूक, सात जणांविरुद्ध गुन्हा
संजय काशिनाथ अग्रवाल (रा. रामवाडी, मालेगावरोड, धुळे) यांनी याबाबत तक्रार दिली.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 12-06-2016 at 00:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case filed against seven persons in fraud case