वाहतुक नियमांचे उल्लघन करणाऱ्यांकडून दंड वसूलीत पारर्दशता यावी म्हणून ई चलान प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र या प्रणालीमुळे दंडाची रक्कम थकवण्याचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात वाहतुक नियमांचे उल्लघन करणाऱ्यांना साडे नऊ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र यापैकी २ कोटी ११ लाख रुपयांचा दंड प्रत्यक्ष जमा झाला आहे. थकीत दंड वसूलीचे मोठे आवाहन वाहतूक पोलिसांसमोर असणार आहे.

हेही वाचा- मुंबईतील ६ हजार कोटी रुपयांच्या रस्ते कंत्राटावरून आदित्य ठाकरेंचं पुन्हा टीकास्र; शिंदे सरकारला विचारले १० प्रश्न

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या

वाहतुक पोलिसांची कारवाई ही जनसामान्यांसाठी कायमच टिकेचा विषय राहिली आहे. त्यामुळे या कारवाईत पारदर्शकता यावी, तसेच नियम मोडणाऱ्यांकडून तातडीने दंड वसूल न करता ई चलान पध्दतीने व्हावी. दंड थेट बँक खात्यात जमा व्हावा या सारख्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. मात्र या सुधारणाच आता वाहतूक पोलीसांसाठी मोठे आव्हान ठरू लागल्या आहेत. ई चलान पध्दतीमुळे दंड थकविण्याचे प्रमाण वाढले आहे. आता थकीत दंड वसूल करणे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे.

हेही वाचा- छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त केक कापणं बांधकाम व्यावसायिकाला पडलं महागात; मुंबई पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई

रायगड जिल्ह्यात २०२२ या वर्षात १ लाख ४८ हजार ५९४ जणांना वाहतुक नियम मोडल्याप्रकरणी चलान जारी करण्यात आले आहे. त्यांच्याकडून ९ कोटी ५७ लाख २९ हजार रुपयांचा दंड वसूल होणे अपेक्षित होते. यापैकी २ कोटी ११ लाख ४८ हजार २०० रुपयांचा दंड प्रत्यक्ष जमा झाला आहे. तर ७ कोटी ४५ लाख ८१ हजार ७५० रुपयांची दंड वसूली शिल्लक आहे. त्यामुळे आता या थकीत दंडाची वसूली करण्याचे मोठे आव्हान वाहतूक पोलीसांसमोर उभे राहीले आहे.

ई चलान पध्दतीमुळे वाहतुक नियम मोडणाऱ्यांमध्ये बेपर्वाई वाढली असून, दंड भरला नाही तरी काही होत नसल्याची मानसिकता तयार होत असल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे ही सर्व प्रकरणे न्यायालयात नेण्याचा निर्णय वाहतुक पोलीसांनी घेतला आहे. चलान मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत दंडाची रक्कम भरणे आवश्यक असते. मात्र ती भरली जात नसल्याने पुढील कारवाईसाठी ही प्रकरणे न्यायालयात दाखल केली जात आहेत. त्याच बरोबर लोकन्यायालयातही या प्रकरणांचा निपटारा करण्याच्या दृष्टीने पोलीसांनी तयारी सुरु केली आहे.

हेही वाचा- Ganga Vilas Cruise : चिरांदमध्ये किनाऱ्याच्या ८०० मीटर अलिकडेच गाळात अडकली बोट, मग नेमकं घडलं काय?

वाहतूक पोलिसांकडून केलेली कारवाई

शिर्षक दाखल गुन्हे

१ हेल्मेट परिधान न करणे २४९१

२ सिटबेल्ट न लावणे १८४२५

३ मद्यपान करून वाहन चालवणे ७४


वर्ष दाखल केसेस दंडाची रक्कम

२०२२ १४८५९४ ९ कोटी ५७ लाख

२०२१ १५३३८९ ४ कोटी ३० लाख