मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज (९ फेब्रुवारी) वाढदिवस आहे. याच कारणामुळे त्यांना राज्यातील वेगवेगळ्या नेत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. ठिकठिकाणी त्यांच्या नावाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. कोणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असेल. मात्र तरीदेखील आम्ही कुणाचे वाईट चिंतित नाही. नेहमी आमच्याच शुभेच्छा सर्वांसोबत असतात, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनीदेखील एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत. असे ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे शिंदे यांना शुभेच्छा देणार नसल्याचे सांगितले आहे. ज्यांनी शिवसेना फोडली, त्यांना शुभेच्छा काय द्यायच्या, असे खैरे म्हणाले आहेत. ते आज (९ फेब्रवारी) माध्यम प्रतनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> Cow Hug Day : ‘१४ फेब्रुवारीला गायीला मिठी मारा’ केंद्र सरकारच्या निर्देशावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “कोणाला मिठ्या…”

मग अशा माणसाला शुभेच्छा द्यायच्या का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणार का? असा प्रश्न चंद्रकांत खैरे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना “ज्यांनी शिवसेना फोडली त्यांना शुभेच्छा देण्याची गरज नाही. ज्याला बाळासाहेबांनी वाढलवले, मोठे केले त्यांनीच शिवसेना फोडली. मग अशा माणसाला शुभेच्छा द्यायच्या का? हट्. राज्यभरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर्स लावण्यात आले आहेत. ते सगळे खोक्यांमुळे (पैशांमुळे) आहे,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली.

हेही वाचा >>> Video : मोदी भाषणाला उभे राहताच संसदेत गदारोळ, विरोधकांकडून ‘मोदी-अदाणी भाई भाई’ म्हणत जोरदार घोषणाबाजी!

आम्ही जगात सर्वांनाच शुभेच्छा देत असतो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी मात्र एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असल्याचे आदित्य ठाकरे यांना सागंतिले. त्यावर बोलताना “आज काही आव्हान देणार नाही. वाढदिवसानिमित्त आम्ही जगात सर्वांनाच शुभेच्छा देत असतो. आमची सवय आहे की, आम्ही कुणाचेही वाईट बघत नाही. आमच्या पाठीत कुणी खंजीर खुपसले असतील, पाठीत वार केले असतील तरी देखील आम्ही कुणाचे वाईट चिंतित नाही. नेहमी आमच्याच शुभेच्छा सर्वांसोबत असतात,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.