चंद्रपूर:चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून रात्री 10.45 वाजताच्या सुमारास भोजराज मेश्राम या कामगाराला वाघाने उचलून नेले. त्यामुळे या परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे. दोन दिवसापासून या भागात वाघ फिरत आहे. काल मंगळवारी रात्री या भागात वाघ फिरत होता. वीज केंद्राने याची माहिती वन खात्याला दिली होती. दरम्यान वन खात्याने बंदोबस्त करण्यापूर्वीच वाघाने कामगाराचा बळी घेतला. त्या व्यक्तीची सायकल रस्त्यावर पडून आहे, गेट नंबर 13 ची घटना आहे. संबंधित कर्मचारी हा CTPS मधील कुणाल एंटरप्राइजेस या कंपनी मध्ये काम करणारा होता. वन विभाग व वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे. काही पूर्वी वीज केंद्रातून एका पाच वर्षीय मुलीला वाघाने उचलून नेले होते. तिचा मृतदेह मिळाला होता. त्यानंतर हिराई विश्राम गृह जवळ वाघाच्या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला होता. त्यानंतरची ही तिसरी घटना आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Feb 2022 रोजी प्रकाशित
चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून वाघाने कामगाराला उचलून नेले
वीज केंद्राने याची माहिती वन खात्याला दिली होती. दरम्यान वन खात्याने बंदोबस्त करण्यापूर्वीच वाघाने कामगाराचा बळी घेतला.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 16-02-2022 at 23:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur power station tiger picked up the worker tiger attack worker akp