scorecardresearch

Premium

“…तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडली पाहिजे”, भाजपाचं थेट आव्हान

“सत्तेच्या लालसेपोटी हिंदूस्तानातील हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांबरोबर शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत.”

uddhav thackeray sharad pawar
बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

सनातन धर्माचं मलेरिया, डेंग्यू, करोना किंवा अन्य रोगांप्रमाणे उच्चाटन झालं पाहिजे, असं विधान तामिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून देशभरात बराच गदारोळ झाला. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिलं आहे.

“उदयनिधी स्टॅलिन यांचं वक्तव्य शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मान्य नसेल, तर ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडली पाहिजे,” असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

alexei navalny marathi news, alexei navalny death marathi news, russian opposition leader alexei navalny marathi news
अकस्मात मृत्यू की राजकीय हत्या? पुतिनविरोधक अलेक्सी नवाल्नी यांना संपवण्याचे कारण काय? जगभर त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य काय?
asaduddin owaisi
“…तर हिंदूंना त्यापासून दूर का ठेवले जातंय?” उत्तराखंडमधील UCC विधेयकाविरोधात असदुद्दीन ओवेसींचा सवाल
poverty
बहुविध दारिद्र्य म्हणजे काय? बहुविध दारिद्र्य निर्देशांक कसा ठरवला जातो?
bharatratna lalkrushna advani
लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न : राम जन्मभूमी आंदोलनातील आडवाणींची निर्णायक भूमिका भाजपासाठी कशी ठरली टर्निंग पॉइंट?

हेही वाचा : “नीलम गोऱ्हे अपात्र व्हायला पाहिजेत, कारण…”, अनिल परब यांचं विधान

बावनकुळे म्हणाले, “‘इंडिया’ आघाडीत असलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘हिंदू धर्म संपत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही’ असं विधान केलं. या वक्तव्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्विकारलं आहे.”

हेही वाचा : “भाजपाविरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे”; बावनकुळेंच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“पण, ‘इंडिया’ आघाडीत असलेल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना उदयनिधी स्टॅलिन यांचं वक्तव्य मान्य असेल, तर त्यांनी सांगितलं पाहिजे. मान्य नसेल, तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडली पाहिजे. सत्तेच्या लालसेपोटी हिंदूस्तानातील हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांबरोबर शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत,” अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandrashekhar bawankule attacks uddhav thackeray and sharad pawar over udaynidhi stalin hindu statement ssa

First published on: 25-09-2023 at 16:27 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×