भारतीय जनता पक्षात सातत्याने विविध नेत्यांचं इन्कमिंग सुरू असतं. त्यावरून भाजपावर नेहमी टीका होत असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नुकतेच एका ठिकाणी म्हणाले, सध्या आयाराम गयारामांना कुठे बसवायचं हा भाजपासमोरचा मोठा प्रश्न आहे. जयंत पाटलांच्या या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बावनकुळे म्हणाले, आमचा पक्ष हा अरबी समुद्रासारखा आहे, भारतीय जनता पक्ष ह महासागर आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या महासागरात कितीही मोठं नेतृत्व आलं किंवा लहान नेतृत्व जरी आलं किंवा कोणत्याही पक्षातून कोणताही नेता आला तरी आमच्याकडे खूप जागा आहे. कारण आम्ही एका विचारधारेतून काम करणारे लोक आहोत. आमच्याकडे खूप शाखा आहेत. समाजातील शेवटच्या व्यक्तीला केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या शाखा आमच्याकडे आहेत. आगामी काळात आम्हाला विधानसभेच्या २८८ जागा युतीत लढायच्या आहेत. लोकसभेच्या ४८ जागा लढायच्या आहेत.




हे ही वाचा >> शिरूर लोकसभेसाठी रस्सीखेच; खासदार अमोल कोल्हेंनी पहिल्यांदाच मांडली भूमिका, म्हणाले…
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमच्या पक्षात कुणीही आलं तरी त्याच्या योग्यतेप्रमाणे आणि शक्यतेप्रमाणे काम देण्यासाठी आमच्याकडे जागा आहेत. ज्यांना ज्यांना भाजपात यायचं असेल त्यांनी भाजपात यावं. आम्ही तुम्हा सर्वांना सामावून घेऊ. सर्वांना योग्य पद्धतीने चांगल्या ठिकाणी क्षमतेप्रमाणे न्याय देण्याचा प्रयत्न करू.