राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त एबीपी माझ्या वृत्तवाहिनीने ‘माझा कट्टा’ कार्यक्रमातून त्यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. दरम्यान, शिवसेना सोडल्याची किंवा बाळासाहेबांना अटक केल्याची खंत वाटते का? असे विचारले असता, त्यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं, याबाबत माहिती दिली.

हेही वाचा – भुजबळ यांना मुख्यमंत्रीपदाने का हुलकावणी दिली? सांगितलं नेमकं कारण; काँग्रेसनेही दिली होती ऑफर, पण…

AJit Pawar vs Supriya Sule
“मी त्यांचा मुलगा नसल्याने संधी मिळाली नाही”, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझी कारकीर्द…”
DCM Ajit Pawar
आईवरून टीका झाल्यानंतर अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुम्हाला एवढ्या मिरच्या झोंबल्या…”
Ajit pawar on sharad pawars
“८४ वर्षांच्या योद्ध्याला तुम्ही लढायला लावताय”, अजित पवारांची शरद पवार गटाच्या नेत्यांवर टीका; म्हणाले “त्यांना बोलताना…”
SM Mushrif Who killed Karkare
‘करकरेंच्या शरीरात नेमक्या कुणाच्या गोळ्या?’ Who Killed Karkare पुस्तकाचे लेखक एसएम मुश्रीफ म्हणाले…
Sanjay Nirupam on Shiv sena joining
“मी आलो आणि भंडारा संपला”, संजय निरुपम यांचे पक्षप्रवेशावेळी विधान; एकनाथ शिंदेंची ‘अशी’ होती प्रतिक्रिया
sharad pawar replied to narendra modi
नरेंद्र मोदींच्या ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांचे म्हणणं खरं आहे, पण…”
Inadequate Public Relations, Misconduct to office bearers , lead to cut the ticket, Mumbai bjp members of parliament, gopal Shetty, Poonam Mahajan, manoj kotak, lok sabha 2024, north Mumbai lok sabha seat, Mumbai north central lok sabha seat, north east Mumbai lok sabha seat, marathi news, bjp Mumbai, Mumbai news,
जनता व कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन मुंबईतील भाजपच्या तिन्ही खासदारांना भोवले
nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?

“राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत आम्ही श्रीक्रृष्ण आयोगाची स्थापना करू, असे आश्वासन जनतेला दिले होते. त्या सरकारमध्ये मी गृहमंत्री होतो. महत्त्वाचे म्हणजे आधीच्या सरकारने सर्व फाईल्स बंद केल्या होत्या. मात्र, एकेदिवशी अचानक एक फाईस माझ्या टेबलवर आली. त्यात पोलिसांचे काही अहवाल होते. जर मी त्यावेळी बाळासाहेबांविरोधात गुन्हा नोंदवला नसता, तर श्रीक्रृष्ण आयोगाची अमंलबजावणी केली नाही, असा आरोप आमच्यावर झाला असता. बाळासाहेबांना अटक झाली, त्यावेळी त्यांना जेलमध्ये नेऊ नका, असे निर्देश मी पोलीस आयुक्तांना दिले होते”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा – ‘कधी वाढदिवसाची आतुरतेने वाट बघितली का?’ छगन भुजबळांनी सांगितली १९६० सालची ‘ती’ आठवण

“शिवसेना सोडण्याची काही वेगळी कारणं होती. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना मी विधानसभेत आमदार होतो. मंडळ आयोग जाहीर झालाच पाहिजे, अशा घोषणा आम्ही देत होतो. व्हीपी सिंह यांनी मंडळ आयोगाची घोषणा केल्यानंतर बाळासाहेबांनी त्याला विरोध केला. जातीनिहाय आरक्षण देऊ नये, अशी बाळासाहेबांची भूमिका होती. मात्र, मी त्यावेळी भटक्या विमुक्त जातींचा मोर्च्यात सहभागी झालो होतो”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, पण मुंबई महापौरपदाच्या कारकिर्दीवर विशेष प्रेम; छगन भुजबळांनी सांगितलं कारण, म्हणाले…

दरम्यान, “जेव्हा मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा बाळासाहेबांनी माझा ‘लखोबा लोखंडे’ असा उल्लेख केला होता. ‘तो मी नव्हेच’ मधला लखोबा लोखंडे जेवढा प्रसिद्ध झाला नाही, तेवढा बाळासाहेब ठाकरेंनी केला”, असेही ते म्हणाले.