राज्य सरकारनं ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर होते. ‘शासन आपल्या दारी’ योजनेमार्फंत ४० ते ५० कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं. मोठा लाभ लाभार्थ्यांना मिळाला आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घराच्या जवळ लाभ देण्याचं काम सरकार करत आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधातील आघाडीचं ‘मातोश्री’ केंद्रस्थान ठरत आहे, असं वाटतं का? असा प्रश्न विचारल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “घरात बसूम काम करणं आणि रस्त्यावर फिरून काम करणं, यातील फरक महाराष्ट्रातील जनतेनं ओळखला आहे. गेल्या अडीच वर्षात घरात बसलेले आणि फिल्डवर काम करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले आहेत. कोणाच्या बैठका कुठे होतात, यात आम्हाला स्वारस्थ नाही.”

ashok gehlot son vaibhav loksabha election
भाजपाने पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा तापवला, अशोक गहलोतांच्या कार्यकाळातील मुद्द्यामुळे सुपुत्र अडचणीत?
Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…

हेही वाचा : “देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात सत्तेची खूप मस्ती , त्यांना…”, ठाकरे गटाच्या खासदाराची सडकून टीका

“मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभेत इतिहास मोडीत निघेल”

“आम्ही ज्या पद्धतीने निर्णय घेत काम करतोय, त्यामुळे विरोधी पक्ष गोंधळला असून, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पंतप्रधान मोदींच्या कामावर देशातील जनता खूश आहे. २०१९ साली सुद्धा आघाड्या करण्यात आल्या होत्या, त्याचं काय झालं? २०१४ पेक्षा जास्तीच्या जागा २०१९ साली मोदींनी जिंकल्या. त्यामुळे या निवडणुकीत कितीही विरोधक एकत्र आले, तरी मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभेत इतिहास मोडीत निघत विजय मिळेल,” असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.

हेही वाचा : ‘या’ १२ घटनांचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर; म्हणाले, “हे सगळे…!”

“विरोधकांना बोलत राहुद्या, आम्ही काम करत राहू”

सरकारमध्ये दम नाही असं विरोधक म्हणत आहेत? असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारल्यावर त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. “घरात बसलेल्यांमध्ये दम आहे का? आमच्या कामांमुळे त्यांचा दम निघून गेला आहे. म्हणून ते बेदम बोलत आहे. त्यांना बोलत राहुद्या आम्ही काम करत राहू,” असा एकनाथ शिंदे म्हणाले.