सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची सोमवारी सांगली दौऱ्यादरम्यान भेट झाली. दोघांनी काही काळ बंद दाराआड चर्चा केली असली तरी याचा तपशील माध्यमांना समजू शकला नाही. मुख्यमंत्री सोमवारी सांगली दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी सांगलीतील आयर्वनि पूल येथे पुराने झालेल्या नुकसानीची माहिती प्रशासनाकडून घेतली. त्याचवेळी टिळक चौक येथे भिडे गुरुजी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते तडक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आढावा बैठकीसाठी रवाना झाले. आढावा बैठक झाल्यानंतर भिडे गुरुजी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात चर्चा झाली. ही भेट बंद दाराआड झाली. या चर्चेचा तपशील माध्यमांना समजू शकला नाही. परंतु या भेटीमुळे तर्कवितर्काना उधाण आले.