नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या २४ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणात १२ नवजात बालकांचाही समावेश आहे. या बालमृत्यूवरून विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली. या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी गरोदर माता सरकारने दिलेल्या गोळ्या घेत नाहीत, असा गंभीर आरोप केला. यावरून आता वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी या आरोपावरून चित्रा वाघ यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, “छोट्या बाळांना पेटीत ठेवतात. तिथे अनेक आई बसलेल्या होत्या. मी त्यांच्याशी बोलले. त्यांचा व्हिडीओ मी माध्यमांना देते. गोळ्या दिल्या जातात, पण आम्ही खात नाही. पोषण आहार दिला जातो, आम्ही कधी खातो, कधी खात नाही. डॉक्टरांनी या गोळ्या घ्यायला सांगितल्या आहेत. त्या गोळ्या घेतल्या असत्या तर मुल तंदुरुस्त असतं आणि तुमच्या मांडीवर खेळत असतं हे आम्ही त्यांना सांगितलं.”

jitendra awhad eknath shinde Insult news
“ठाण्यात मुख्यमंत्र्यांचा अपमान, माझ्यासारख्या विरोधकालाही वाईट वाटलं”, जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला!
sassoon hospital marathi news
ऑपरेशन ‘ससून’! अधिष्ठात्यांना डावलून थेट आयुक्तांनी हाती घेतली सूत्रे
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

“सरकार औषधं आहार पुरवू शकतो, त्यांना गिळायला लावू शकत नाही”

“आपण औषधं आणि पोषण आहार पुरवू शकतो, त्यांना गिळायला लावू शकत नाही. आशा सेविका लोह आणि इतर गोळ्या देतात. मात्र, गर्भवती माता या गोळ्या घेतात की नाही इथून आपल्याला बघण्याची गरज आहे,” असं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं.