उपसरपंच निवडीवेळी भाजप व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी झालेल्या हाणामारीत शिवसेनेच्या एका ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे ही घटना घडली. या हाणामारीमध्ये राष्ट्रवादीचे दोन कार्यकत्रे जखमी झाले असून त्यांना  सांगलीतील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उपसरपंच निवडीवेळी झालेल्या मारहाणीमध्ये ग्रामपंचायतीतील शिवसेनेचे सदस्य पांडुरंग जनार्दन काळे (वय ५५) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे गावातील वातावरण तणावग्रस्त बनले असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे खासदार संजय पाटील यांचे समर्थक असलेले आठ, तर राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांचे समर्थक असलेले तीन सदस्य आहेत. शिवसेनेचे माजी आमदार अजितराव घोरपडे समर्थक पांडूरंग काळे यांनी राष्ट्रवादीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. यावरून  त्यांच्यावर काठीने व लोखंडी गजाने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. उपसरपंच निवडीवरून राष्ट्रवादी आणि भाजप  कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. काठावरील सदस्य संख्या असलेल्या भाजपकडून काळे यांना आपल्या गटात सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र त्यांनी राष्ट्रवादीला सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याने  त्यांच्यावर गुरुवारी हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clashes between activists during the election of the deputy sarpanch abn
First published on: 05-03-2021 at 00:19 IST