मुख्यमंत्र्यांनी कारवाईची मागणी फेटाळली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांचे विदर्भासंदर्भातील ‘ते’ वक्तव्य वैयक्तिक असल्याचे सांगून त्यावर कारवाईची शिवसेना, तसेच विरोधकांची मागणी फेटाळून लावली.
यावरून विरोधक मात्र आक्रमक झाले आहेत. घटनात्मक पदावरील व्यक्तीने असे विधान करणे अयोग्य आहे. त्यांच्याविरुद्ध महाभियोग आणण्यात येईल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर शिवसेना सभागृहात काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. या मुद्यांवरून शिवसेना पहिल्या दिवसांपासून अणेंच्या राजीनाम्याची मागणी करीत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील बुधवारी याचा पुनरुच्चार केला.
अणे यांनी त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना केंद्राला स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन दिसत नाही.
तेलंगणात झालेल्या हिंसक आंदोलनाची सरकार दखल घेते. असे आंदोलन केल्यावर सरकारला दिसेल काय, असे आंदोलन करणे सोपे आहे. सार्वमत चाचणी घेण्यात यावी. त्यात जनतेचा पाठिंबा दिसल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य करावे, अन्यथा सोडून द्यावे, असे विधान महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केले होते.