प्राचार्य रामदास डांगे व्रतस्थ साधकाप्रमाणे आयुष्यभर संशोधन करीत राहिले. साहित्य, संस्कृती, अध्यात्म क्षेत्रांत काम करतानाच अनेकांच्या आयुष्यात दीपस्तंभाप्रमाणे कार्य केले. डांगे यांच्या स्मृती कायमस्वरूपी जागविण्यासाठी महापालिका पुढाकार घेईल. या संदर्भात उपक्रमांविषयी शहरातील जाणकारांची समिती गठीत केली जाईल. ही समिती सुचवेल त्या उपक्रमांना मनपा कृतिशील पाठिंबा देईल, असे महापौर प्रताप देशमुख यांनी सांगितले.
प्राचार्य डांगे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बी. रघुनाथ सभागृहात शोकसभा घेण्यात आली. मान्यवरांनी डांगे यांच्या स्मृती जागवल्या व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा दिला. महापौर प्रताप देशमुख, डॉ. शिवाजी दळणर, डॉ. विवेक नावंदर, कवी इंद्रजित भालेराव, आर. डी. देशमुख, संजय देशमुख आदी उपस्थित होते. महापौर देशमुख यांनी प्राचार्य डांगे परभणीकरांचे भूषण होते, असे सांगून त्यांनी साहित्य व संशोधन क्षेत्रात केलेली कामगिरी उल्लेखनीय असल्याचे सांगितले. डॉ. दळणर यांनी डांगे यांचा उल्लेख मार्गदर्शक असा करून अनेकांच्या आयुष्याला पलू पाडण्याचे काम त्यांनी केल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार कृ. ना. मातेकर यांनीही डांगे यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. प्राचार्य दीनानाथ फुलवाडकर, डॉ. बी. यू. जाधव, डॉ. अविनाश सरनाईक यांनी आपापल्या महाविद्यालयांशी संबंधित डांगे यांच्या आठवणी सांगितल्या.
अॅड. रमेश गोळेगावकर यांनी डांगे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पलू उलगडून दाखवले. शब्दसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने अरुण चव्हाळ यांनी मनोगत व्यक्त केले. संजय देशमुख यांनी डांगे यांच्या साहित्यिक कर्तृत्वाचा आढावा घेतला. डॉ. दत्तात्रय मगर, प्रा. किसन चोपडे, प्रा. अनंतराव िशदे, अॅड. विष्णू नवले, शिवाजी मरगिळ आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रा. पंढरीनाथ धोंडगे, बा. बा. कोटंबे, डॉ. आनंद देशपांडे, डॉ. अनिल दिवाण, सचिन देशमुख, प्रमोद वाकोडकर आदी उपस्थित होते. ज्ञानोबा मुंढे यांनी सूत्रसंचालन केले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jul 2014 रोजी प्रकाशित
‘व्रतस्थ साधकासारखे प्राचार्य डांगे यांचे कार्य’
प्राचार्य रामदास डांगे व्रतस्थ साधकाप्रमाणे आयुष्यभर संशोधन करीत राहिले. साहित्य, संस्कृती, अध्यात्म क्षेत्रांत काम करतानाच अनेकांच्या आयुष्यात दीपस्तंभाप्रमाणे कार्य केले.

First published on: 05-07-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Concolence work of principal ramdas dange