अलिबाग तालुक्यातील रस्त्यांची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण आहेत. पावसाळ्यानंतर रस्ता दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करणे अपेक्षित होते मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन आहेत. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसच्या कमिटीच्या शिष्टमंडळाने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच भेट घेतली. रस्त्यावरचे खड्डे भरले नाहीत. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नसल्याचा इशारा या वेळी देण्यात आला. अलिबाग तालुक्यातील अलिबाग-रेवस, काल्रेिखड ते कणकेश्वर फाटा, काल्रेिखड ते हाशिवरे माग्रे रेवस, अलिबाग-वडखळ, अलिबाग-रेवदंडा-मुरूड, अलिबाग-रोहा या रस्त्यांची सध्या दुरवस्था झाली आहे. रस्त्यांतील खड्डे आणि त्यामुळे पसरलेली धूळ यामुळे तालुक्यातील अनेकांना श्वसनाच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अलिबाग तालुक्यातील या सर्व रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीने केली आहे.
काँग्रेसने अलिबाग-रेवस, काल्रेिखड ते कणकेश्वर फाटा येथील धोकादायक खड्डय़ांची चित्रफीतच बांधकाम विभागाकडे सादर केली. निकृष्ट दर्जाची कामे करूनही हा विभाग संबंधित ठेकेदारांविरोधात बांधकाम विभाग कोणतीही कायदेशीर कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. या मार्गाची दुरुस्ती येत्या ८ दिवसांत सुरू झाली नाही तर काँग्रेस पक्षातर्फे बांधकाम विभागाच्या एकाही अधिकाऱ्याला अलिबागमध्ये फिरकू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. तसेच रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. या वेळी माजी आमदार मधुकर ठाकूर, अॅड्. उमेश ठाकूर, ओबीसी सेलचे अध्यक्ष सुनील थळे, पंचायत समिती सदस्य उमेश थळे, चंद्रकांत खोत, किशोर सातमकर, अनिल जाधव, संजय िशदे, अनिल माने, सुचित थळे, रूपेश देसाई इ. उपस्थित होते. दरम्यान काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती केली जाईल असे सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Oct 2015 रोजी प्रकाशित
रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत काँग्रेस आक्रमक
अलिबाग तालुक्यातील रस्त्यांची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
Written by रत्नाकर पवार

First published on: 16-10-2015 at 00:27 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress agressive about bad roads