चंद्रपूर बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत १८ पैकी १२ जागांवर भाजपा आणि काँग्रेस समर्थित शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलचा विजय झाला आहे. तर, काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या शेतकरी सहकार पॅनलला अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बाळू धानोरकर यांना मोठा धक्का बसला आहे.

बाजार समितीच्या या निवडणुकीत बाळू धानोरकर यांनी काँग्रेसचा वेगळा पॅनल उभा केला होता. तर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीने दुसरा पॅनल उभा केलेला. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्येच मुख्य लढत झाली होती. पण, या लढतीत बाळू धानोरकर यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे.

Mahavikas Aghadi, Bhiwandi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरीची चिन्हे, मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५४ अर्जांचे वितरण
Ajit pawar
निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना दिलासा, आचारसंहितेचा भंग प्रकरणी क्लीन चिट
congress leader sonia gandhi choose rajya sabha fear of defeat polls says pm narendra modi
पराभवाच्या भीतीने सोनिया गांधी राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
sanjay raut
“आम्हाला त्या मतदारसंघात…”, उमेदवाराचं नाव पाहून संजय राऊतांनी मानले भाजपाचे आभार; नेमकं प्रकरण काय

हेही वाचा : वाशीम : बाजार समित्यांच्या निवडणुकीत ‘वंचित’ची ‘एन्ट्री’, भाजपाला धक्का, तर महविकास आघाडीने गड राखले

अशातच बाळू धानोरकर यांनी विजय वडेट्टीवारांना आव्हान दिलं आहे. “विजय वडेट्टीवर आणि माझ्यात वैरत्व नाही. पण, ‘खासदाराने आपलं क्षेत्र सांभाळलं नाही’, असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. खासदार सक्षम आहे. सक्षम वाटत नसेल, तर त्यांनी चंद्रपुरातून लोकसभा निवडणूक लढावावी. आम्ही ब्रम्हपुरी पाहण्यासाठी सक्षम आहे,” असं बाळू धानोरकरांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “पलटन वाढवू नका, एक-दोन अपत्यांवरच…”, अजित पवारांचा बारामतीकरांना मिश्कील सल्ला; उपस्थितांमध्ये एकच हशा!

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेनेची ( ठाकरे गट ) एकहाती सत्ता आली आहे. ठाकरे गटाचे नेते रवींद्र शिंदे यांच्या पॅनलला १८ पैकी १२ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस समर्थित पॅलला ६ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात ठाकरे गटाकडे एकहाती सत्ता असलेली पहिली बाजार समिती आली आहे.