मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे असं सांगताना नाना पटोले यांनी मला सुखाने जगू देणार नाहीत असंही म्हटलं आहे.

सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर…; नाना पटोलेंचं उद्धव ठाकरे, अजित पवारांवर टीकास्त्र

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

“सोनिया गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसची भूमी असल्याचं सांगितलं आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे”, असं नाना पटोले यावेळी म्हणाले. “महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायचा मानस मी केला आहे. कोणीही घाबरण्याचं कारण नाही. फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत उल्लेख केला होता. मला काही सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे,” असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.

“नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर बोलणार नाही,” ‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवारांनी लगावला टोला

मी इथे आहे याचीही रिपोर्ट गेला असेल

“महाराष्ट्रात काँग्रेस उभी होत असल्याचं त्यांना माहिती आहे. आयबीचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी नेऊन द्यावा लागतो. कुठे बैठका, आंदोलन सुरु आहे, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचीही रिपोर्ट गेला असेल. रात्री ३ वाजता माझी सभा पार पडली हे कोणाला माहिती नसेल पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे,” असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.

शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे

“स्वबळाची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. कुठेतरी आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार,” असाही आरोप यावेळी त्यांनी केला.

सोबत राहून पाठीत सुरा खुपसला जात आहे

लोणावळा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. कार्यकर्त्यांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, “मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितलं. मग मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे. काही नाही”, असा चिमटा पटोले यांनी उद्धव ठाकरेंना काढला.

यावेळी अजित पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. “आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात… आपल्या लोकांची कामं करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं… कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही,” असा टोला नाना पटोले यांनी लगावला. “ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचंच नाही. तो राग आपल्याला ताकद बनवायचा आहे”, असंही नाना पटोले म्हणाले होते.

नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर बोलणार नाही – शरद पवार

पाठीत सुरा खुपसला जात असल्याच्या नाना पटोले यांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला होता.  ते म्हणाले होते की, “या गोष्टीत मी पडत नाही. ती लहान माणसं आहेत, त्यांच्यावर मी कशाला बोलू? जर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो”.