सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. उर्फी जावेदला अर्धवट कपड्यात सार्वजनिक ठिकाणी फिरू देणार नाही, असा पवित्रा चित्रा वाघ यांनी घेतला. यानंतर दोघांमधील हा वाद वाढला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी या वादात उडी घेतली आहे.

चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला प्रसिद्ध करण्याची सुपारी घेतली का? याबाबत शंका उपस्थित केली आहे. तसेच चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांमध्ये गुरफटण्यापेक्षा महाराष्ट्रातील महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं, असा टोला सव्वालाखे यांनी लगावला. त्या जालना येथे पत्रकारांशी संवाद साधत होत्या.

Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
BJP needs support from MNS A look at Raj Thackeray stance on participation in the Grand Alliance
भाजपला मनसेची साथ हवी ; महायुतीतील सहभागाबद्दल राज यांच्या भूमिकेकडे लक्ष
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र

हेही वाचा- “उर्फी जावेदचा नंगानाच सावित्रीच्या लेकींना..” चित्रा वाघ पुन्हा एकदा आक्रमक

उर्फी जावेद यांच्या वस्त्रावरून भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी वेगवेगळे वक्तव्ये केली आहेत. त्यावरून काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, चित्रा वाघ जेवढ्या जोमात महिलांचे आवाज उठवतात. तेवढ्याच जोरात त्या निमूटपणे शांतही होतात. उर्फीच्या कपड्याभोवती गुरफटण्यापेक्षा महाराष्ट्रात महिलांचे अनेक प्रश्न आहेत. महिलांच्या त्या प्रश्नांकडे चित्रा वाघ कधीही लक्ष देत नाहीत. कंगना राणावत यांच्या बेताल वक्तव्यावर चित्रा वाघ गप्प असतात, अशी प्रतिक्रिया सव्वालाखे यांनी दिली.

हेही वाचा- “जर दोनच लोक मंत्रिमंडळाचा निर्णय घेणार असतील, तर बाकी मंत्र्यांनी…” सुप्रिया सुळेंचं विधान!

त्या पुढे म्हणाल्या, “उर्फी जावेदला प्रसिद्ध करण्याची सुपारी तर चित्रा वाघ यांनी घेतली नाही ना… अशी शंका निर्माण होत आहे. दिल्लीमध्ये एका मुलीला फरपटत नेण्याची घटना घडली. परंतु त्याबाबत चित्रा वाघ यांनी एक शब्दही काढला नाही. दिल्लीतील महिला आयोगाबद्दल चित्रा वाघ एक शब्दही काढत नाहीत. परंतु महाराष्ट्राच्या महिला आयोगावर त्या सतत बोलत असतात, हा त्यांचा प्रसिद्धीसाठीचा खटाटोप आहे” असा टोलाही संध्या सव्वालाखे यांनी लगावला.