निषेधासाठी लातुरातील बाह्य रुग्ण विभाग बंद

लातूर : वाहतूक पोलीस आणि डॉक्टर यांच्यात बाचाबाची झाल्याचा प्रकार सोमवारी रात्री नऊच्या सुमारास येथील शिवाजी चौकात घडला. वाहतूक पोलिसाकडून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे तर शासकीय कामात डॉक्टरांनी अडथळा आणला म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. डॉक्टरांना झालेल्या मारहाणाचा निषेध म्हणून शहरातील सर्व डॉक्टरांनी मंगळवारी दिवसभर आपले दवाखाने बंद ठेवले. इंडियन मेडिकल असोसिएशनने ही बंदची हाक दिली होती. डॉ. आनंद दिनकर गोरे (४४), चेतन ज्ञानोबा हाके (२७) हे दोघे मोटारीने अंबाजोगाई रस्त्याच्या दिशेने जात असताना शिवाजी चौकात  त्यांच्या वाहनासमोर एक वृद्ध महिला अचानक आली. त्यामुळे डॉक्टरांनी भर चौकात वाहन थांबविले. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाने भर चौकात वाहन का थांबविले? अशी विचारणा करून वाहतूक पोलिसाने वाहनाच्या काचेतून हात घालून डॉ. गोरे यांची मानगूट धरली तर त्यानंतर डॉक्टरांनी वाहतूक पोलिसाला ढकलले.

Ravi Kishan DNA test,
रवी किशन यांच्या डीएनए चाचणीची मागणी न्यायालयाने फेटाळली
man was stabbed to death in a fight between two groups in nagpur
नागपुरातली गुन्हेगारी थांबेना… आता दोन गटांच्या भांडणात एकाची भोसकून हत्या…
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
high court ask Questions to bmc and sent notice over Tragic Deaths of children in Wadala
दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न

या प्रकारानंतर डॉक्टरांना भर रस्त्यात मारहाण करण्यात आली आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या ठिकाणी पोलिसांकडून डॉक्टरांना पुन्हा मारहाण करण्यात आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हा प्रकार समजताच शहरातील अनेक डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. जिल्हा पोलीसप्रमुख निखिल पिंगळे हे स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाले. दरम्यान, या प्रकरणी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. जिल्हा पोलीस प्रमुख निखिल पिंगळे ,अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन, शहर पोलीस उपाध्यक्ष जितेंद्र जगदाळे यांनी या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी केली जाईल, असे आश्वासन डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला दिले. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र वाहतूक पोलिसाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. डॉक्टरांना भर चौकात मारहाण करणे चुकीचे असल्याचे वैद्यकीय संघटनेच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे यांनी सांगितले.