महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले

साताऱ्यातील घटत्या करोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आज निर्बंधामध्ये मोठी शिथिलता आणल्याचे जाहीर केले आहे.  

पर्यटकांची करोनाची जलद चाचणी करण्यात येणार

वाई : महाबळेश्वर, पाचगणी ही राज्याची पर्यटनस्थळे प्रदीर्घ टाळेबंदीनंतर  शनिवारपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येत आहेत. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची करोनाची जलद चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी दिली.

साताऱ्यातील घटत्या करोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आज निर्बंधामध्ये मोठी शिथिलता आणल्याचे जाहीर केले आहे.   गेल्या दोन महिन्यांपासून महाबळेश्वर, पाचगणी ही  पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती.  निर्बंधांमुळे   बाजारपेठा, व्यवस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. येथे येणाऱ्या पर्यटकांची जलद प्रतिजन चाचणी करण्यात येऊन त्यात बाधित नसलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याचे राजापूरकर-चौगुले यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection lockdown mahabaleshwar pachgani open to tourists akp