एकीकडे राज्यात करोनाने थैमान घातलं असताना आतापर्यंत एकही मृत्यू न झालेल्या यवतमाळमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या करोनाबाधित महिलेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात करोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. दरम्यान पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १२५ पर्यंत गेला असून यापैकी ९९ जण बरे होऊन घरी गेले आहे.

आणखी वाचा- सोलापुरात करोनाचे आणखी तीन बळी; नऊ नव्या रूग्णांची भर

मृत झालेल्या या महिलेच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे सुरवातीपासून अतिशय काळजीपूर्वक लक्ष होते. तिला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शनिवारी मध्यरात्रीपासून शर्थीचे प्रयत्न केले. मात्र अखेर श्वसनाच्या त्रासामुळे तिचा मृत्यू झाला. दरम्यान मुंबईवरून आलेला आणि सुरुवातीपासून संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती असलेल्या एका व्यकीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५ झाली आहे.