जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक दीपक मानकर अखेर पुणे पोलिसांसमोर हजर झाले आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर पोलिसांसमोर शरण येणे त्यांना भाग पडले. यानंतर काही वेळातच त्यांना शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे.

नगरसेवक दीपक मानकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी पुणे जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. या दोन्ही ठिकाणी त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर मागील आठवड्यात झालेल्या अंतिम सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळत पुढील दहा दिवासांत पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज (बुधवारी) दीपक मानकर पोलिसांसमोर हजर झाले.

n m joshi marg bdd chawl redevelopment
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास; दोन वर्षांत १२६० घरांचा ताबा देण्याचे म्हाडाचे आश्वासन
Special court order BJP MP Pragya Singh
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला नियमितपणे उपस्थित राहा, साध्वी प्रज्ञासिंह यांना विशेष न्यायालयाचे आदेश
chief justice dy chandrachud
सरन्यायाधीश कोर्टात आले आणि आपली खुर्ची सोडून चक्क समोरच्या स्टूलवर जाऊन बसले; ‘या’ कृतीचं होतंय सर्वत्र कौतुक!
Supreme Court Grants Conditional Bail to former professor Shoma Sen in Bhima Koregaon Case
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला जामीन, या अटी घातल्या…

जितेंद्र जगताप यांनी एका भुखंड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर आणि बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्याकडून आपला मानसिक छळ होत असल्याची सुसाईड नोट लिहून २ जून २०१८ रोजी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर मानकरांसह अन्य पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुरुवातीला लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो पुण्यातील समर्थ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. दरम्यान, मानकरांव्यतिरिक्त यापूर्वी विनोद भोळे, सुधीर सुतार, अमित तनपुरे, अतुल पवार आणि विशांत कांबळे यांना अटक करण्यात आली आहे.