राज्यात आज दिवसभरात पुन्हा एकदा नवीन करोनाबाधितांची संख्या ही हजाराच्या आतमध्ये आढळून आली आहे. ६६१ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ८९६ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. याचरोबर १० रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५८,०४५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,१६,७६२ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४०३७२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,३१,७५,०५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,१६,७६२ (१०.४७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,४८,८८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १४,७१४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.