मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डी.लीट पदवी देत सन्मानित करण्यात आलं आहे. मंगळवारी ( २८ मार्च ) डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये पार पडलेल्यी दीक्षांत समारोहात त्यांना डी. लीट ही पदवी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली आहे. यावेळी एकनाथ शिंदेंनी जोरदार फटकेबाजीही केली.

एकनाथ शिंदे म्हणाले, “मुलगा श्रीकांत शिंदे यांनी याच डी. वाय. पाटील संस्थेतूनच एमबीबीएस आणि त्यानंतर एमएस पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्याच विद्यापीठाने डी. लीट पदवीने सन्मान केला, ही खूप मोठी गोष्ट आहे. सन्मान करण्यासाठी पात्र आहे, की नाही माहिती नाही. पण, गौरव किंवा सन्मान होत असताना मागचा काळही आठवायचा असतो.”

हेही वाचा : “मुंबईत ७२ व्या मजल्यावर कोणासाठी फ्लॅट घेतला?” रूपाली पाटलांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. त्याबद्दल मनात जिद्द आणि खंतही होती. मात्र, तीन वर्षापूर्वी बीएची पदवी घेतली. त्यात चांगले गुण मिळवून उत्तीर्णही झालो. अजूनही पुढं शिकायचं आहे,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

हेही वाचा : “एकही अश्लील शब्द वापरल्यास राजीनामा देईन”, संजय शिरसाटांच्या विधानावर सुषमा अंधारेंचा पलटवार; म्हणाल्या…

“कुलपती विजय पाटील म्हणाले, तुम्ही आता डॉ. एकनाथ शिंदे होणार. पण, यापूर्वीच मी डॉक्टर झालोय. छोटीमोठी ऑपरेशन करत असतो. समाजात इतके वर्ष काम करतोय. जगाच्या विद्यापीठाच्या माध्यमातून खूप शिकलो आहे,” असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.