सातारा-ठोसेघर रस्त्यावर सज्जनगड जवळ दरड कोसळली आहे. मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे.

दरड कोसळल्यानंतर घटनास्थळी असलेल्या वाहनचालक थोडक्यात वाचले आणि मोठी दुर्घटना टळली. तर, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात संबंधित घटना घडली तिथे गेल्या तीन दिवसांपासून विविध ठिकाणी दरडी कोसळत होत्या. मात्र रात्री सातारा-ठोसेघर रस्त्यावर सज्जनगड जवळ रात्री ही दरड कोसळल्या नंतर या भागात जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

dombivli, thakurli, traffic jam, Thakurli flyover
डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाण पूल कोंडीच्या विळख्यात, दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत पुलावर वाहनांचा रांगा
Ulhas river, pollution, Ulhas river latest news,
उल्हास नदीचे ‘हिरवे’ रूप पाहिले का ? जलपर्णीमुळे नदीपात्र हरवले, उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात
Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन

साताऱ्याच्या पश्चिम भागात महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावली, कास पठार, ठोसेघर, पाटण या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन दिवसापूर्वी जावली तालुक्यात दरड कोसळली होती. महाबळेश्वर, किल्ले प्रतापगड रस्त्यावर कुंभरोशी जवळ दरड कोसळली होती. त्यानंतर आता सज्जनगड जवळ ठोसेघर मार्गावर दरड कोसळली आहे.

कोठेही जीवित हानी अथवा मालमत्तेचे नुकसान नाही –

साताऱ्याच्या पश्चिम भागातील जनजीवन संततधार पावसामुळे विस्कळीत झाले आहे, तर साताऱ्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून त्या परिसरात अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या पेरण्याही झालेल्या नाहीत. वाईच्या जोरखोऱ्यात दोन दिवसांपूर्वी एका दिवसात, ३२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. येथील २६ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मागील वर्षी याच महिन्यात एका दिवसात ९५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. हा परिसर क्षेत्र महाबळेश्वरच्या लगत येतो. यावर्षीच्या पावसाने कोठेही जीवित हानी अथवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. प्रशासन सतर्क आहे.

मेढा ते ऐकीव रोडवर दरड कोसळली –

साताऱ्यात काल रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे.जावळी तालुक्यात मेढा ते ऐकीव रस्त्यावर दरड कोसळण्याची घटना घडली. डोंगरावरील माती आणि दगड पावसामुळे निसरटे झाले असल्याने धोका निर्माण झाला आहे.बाजूला असलेल्या डोंगराचा काही भाग रस्त्यावर कोसळला असून ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.