कार चालवणे शिकत असलेल्या अल्पवयीन मुलाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि बेफाम कारने रस्त्यावरील तीन मोटारसायकलींना उडवले आणि एका चारचाकी वाहनाला धडक दिली. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास शहरातील काल्डा कॉर्नरजवळ घडलेल्या या प्रकारात आठजण जखमी झाले. यातील गंभीर जखमी झालेल्या एकाला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी संबंधित १६ वर्षीय मुलगा व त्याच्या पालकास उस्मानपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया संध्याकाळपर्यंत सुरू होती.
कौशल्यनगर काल्डा कॉर्नर येथे राहणारा हा मुलगा सकाळी स्विफ्ट कार (एमएच २० बीआर ७३७३) चालविण्यास शिकत होता. कारमध्ये त्याच्या बाजूच्या सीटवर त्याचे वडील राजेश गंगाधर काकडे बसले होते. दोघे बाप-लेक शहानूरमियाँ दग्र्याकडून अमरप्रित चौकाकडे जात होते. सकाळी साडेआठच्या सुमारास काल्डा कॉर्नरजवळील रोपळेकर चौकात मुलाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले व रस्त्यात येईल त्याला धडका देत कार पुढे जाऊ लागली. एमएच २० बीझेड ६१७०, एमएच २० बीएच २८६२ व एमएच २० एजी ८४४ या क्रमांकाच्या मोटारसायकलींना धडका देऊन समोरच असलेल्या एमएच २० सीएच २२८१ या व्ॉगन आर कारवर आदळून ही कार थांबली. या अपघातात विष्णू जगन्नाथ मगर (वय ३५, आडगाव, फुलंब्री) हृदयनाथ रामनाथ जाधव (वय ३२, शिवशंकर कॉलनी) या दोघांसह अन्य आठजण किरकोळ जखमी झाले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या विष्णू व हृदयनाथ या दोघांना जवळच्या दोन वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, हा प्रकार घडला त्यावेळी जवळच असलेली शाळा सुटल्याने १५-२० मुले याच रस्त्याने पायी निघाली होती. त्यांचे दैव बलवत्तर म्हणूनच एका कारवर धडकून ही कार थांबली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या कारसह मुलगा व त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2014 रोजी प्रकाशित
भरधाव स्विफ्टची चार वाहनांना धडक; ८ जखमी, दोघे ताब्यात
कार चालवणे शिकत असलेल्या अल्पवयीन मुलाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि बेफाम कारने रस्त्यावरील तीन मोटारसायकलींना उडवले आणि एका चारचाकी वाहनाला धडक दिली. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास शहरातील काल्डा कॉर्नरजवळ घडलेल्या या प्रकारात आठजण जखमी झाले.
First published on: 05-04-2014 at 04:47 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dash to swift car 8 injured