रत्नागिरी – संगमेश्वर तालुक्यातील देवरूख कोसुंब रेवाळेवाडी येथे घडलेल्या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. सासरा घरातील कामे करावयास सांगतो म्हणून राग आल्याने सुनेने जेवणामध्ये विषारी द्रव्य टाकून सासऱ्याला जीवे मारण्याचा धकादायक प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. याघटनेत नवऱ्यालादेखील विषबाधा झाल्याने सुनेला देवरूख पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सचिन जगन्नाथ सोलकर (वय ३४) यांनी फीर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या सुनेचे नाव स्वप्नाली सचिन सोलकर (वय ३२) असे आहे. सचिन सोलकर व स्वप्नाली सोलकर यांचा १३ एप्रिल २०२५ रोजी विवाह झाला. स्वप्नाली हीला सासरे जगन्नाथ सोलकर हे घरातील कचरा काढणे, साफसफाई करणे व इतर कामे चांगल्या प्रकारे करण्यास सांगायचे. याचा राग स्वप्नालीला आला. या रागाच्या भरात जगन्नाथ सोलकर यांना जीवे ठार मारण्यासाठी त्यांच्या जेवणामध्ये विषारी द्रव्य घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. यातील जेवण सचिन सोलकर याने देखील खाल्याने त्याला देखील विषबाधा झाली. ही घटना २२ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता घडली.

जगन्नाथ सोलकर व सचिन सोलकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना प्रथम देवरूख ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान जगन्नाथ सोलकर व सचिन सोलकर यांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आता या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सचिन सोलकर याने दिलेल्या फिर्यादीनुसार स्वप्नाली सोलकर हीच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात शुक्रवारी उशिरा गुन्हा दाखल करून पोलीसांनी ताब्यात देखील घेतले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.