युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या ‘शिवसंवाद’ यात्रेचा पुढील टप्पा सोमवारी ( ७ फेब्रुवारी ) नाशिकमधून सुरु झाला. यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, मी ठाण्यातून लढतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले. याला शिंदे गटाचे प्रवक्ते, मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“मुख्यमंत्री घाबरले आहेत. त्यांना वरळीतून लढायचं नसेल, तर आमदारकी आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. मी ठाण्यातून लढतो. सध्या महाराष्ट्रातील वातावरण इतकं पेटलं आहे की, निवडणूक झाली तर एकच रंग दिसेल; तो फक्त भगवा, भगवा आणि भगवा. आता लोक विचारतील, भगवा रंग कोणाचा? कोणत्या गटाचा? त्यांना सांगू इच्छितो की भगवा रंग शिवसेनेचा,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

Haryana Chief Minister Manohar Lal Khattar
हरियाणा भाजपामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी चढाओढ; ‘या’ चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता
rahul gandhi wayanad election
सीपीआयने उमेदवार दिल्यानंतरही काँग्रेसला वायनाडमधून राहुल गांधीच का हवेत?
sharad pawar review meeting in pune for baramati lok sabha constituency
सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात; बारामती लोकसभेची पुण्यात आढावा बैठक
Ready to contest Lok Sabha from Amravati if Navneet Rana gets bogus caste certificate says Imtiaz Jalil
“नवनीत राणांनी बोगस जात प्रमाणपत्र मिळवून दिल्यास अमरावतीतून लोकसभा लढण्यास तयार,” इम्तीयाज जलील यांची टीका, म्हणाले…

हेही वाचा : बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिल्याची चर्चा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “त्यांचा आणखी राजकीय…”

“आम्ही कोणाला खिजवत नाही, पण…”

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिलेल्या आव्हानंतर दीपक केसकरांनी ‘डिपॉजिट’ वाचवण्याचा सल्ला दिला आहे. “आदित्य ठाकरेंनी आवश्य ठाण्यात यावं, आम्ही कोणाला खिजवत नाही. पण, आदित्य ठाकरेंनी आपली अनामत रक्कम ( डिपॉजिट ) वाचवून दाखवावं. एक ते दीड वर्षात विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत,” असं दीपक केसरकरांनी म्हटलं.

हेही वाचा : “मी असलं घाणेरडं राजकारण कधीही…”, बाळासाहेब थोरात प्रकरणावर नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया!

“राजकीय दृष्ट्या ही निवडणूक ती निवडणूक लढवेल, असं…”

“आदित्य ठाकरेंनी मंत्री असताना स्वत:चं कर्तव्य पाडलं नाही. मग, राजकीय दृष्ट्या ही निवडणूक ती निवडणूक लढवेल, असं म्हणण्याचा नैतिक अधिकार त्यांना आहे का? ज्यांना निवडून येण्यासाठी दोघांना विधानपरिषदेवर घेण्यात आलं. हे केल्यानंतर ते आमदार झाले,” असा टोला दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंना लगावला.