लोकसभेच्या निवडणुकीत सत्तेच्या नशेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला जसा रस्ता दाखविला तोच रस्ता विधानसभेच्या निवडणुकीतही शिवसैनिकांनी दाखवून महाराष्ट्राच्या विधानभवनातून या सत्ताधाऱ्यांना हाकलून भगवा फडकविण्याचे आवाहन शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले. ते गोंदिया येथे शनिवारी आयोजित शिवसेनेच्या ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ मोहिमेची सुरुवात करताना केले.
ठाकरे म्हणाले, ह्लउभ्या महाराष्ट्रात कोरडय़ा दुष्काळाची परिस्थिती असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पावसाने डोळे वटारल्याने तो पुन्हा संकटात सापडला आहे. या शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप-सेना महायुतीच्या सर्व खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कोरडय़ा दुष्काळातील शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती मी करणार आहे.
राज्यात आतापयर्ंत कांॅग्रेस व राष्ट्रवादीने जातीपातीचे राजकारण करून सत्ता हस्तगत केली, परंतु लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने त्यांना धक्के दिले. त्यातच प्रफुल्ल पटेलांसारख्यांचाही पराभव झाला. आता विधानसभेच्या निवडणुका होणार असून, विदर्भाच्या विकासासाठी गोंदियाच्याच नव्हे, तर संपूर्ण विदर्भातील जागांवर भगवा फडकविण्याचा निर्धार करून शिवसनिकांनी गावागावात शाखा आणि प्रत्येक घरात शिवसनिक तयार करावेत.ह्व
‘महिलांच्या अब्रुचे िधडवडे निघत असतांना राज्याचा गृहमंत्री मात्र निर्लज्जासारखे प्रत्येक घरी पोलिस दिला तरी अत्याचार थांबवू शकत नाही, असे बोलून महिलांचा अपमान तर करतोच शिवाय, पोलिसांच्या कर्तबगारीवरही प्रश्नचिन्ह उभे करतो. अशा गृहमंत्र्यांकडून न्यायाची आणि रक्षणाची कशी हमी आम्ही बाळगणार? चांद्यापासून बांद्यापयर्ंत भगवा फडकावयाचा असून, पुढची निवडणूक आम्ही कुठल्याही परिस्थितीत जिंकणार म्हणजे जिंकणारच, असा विश्वास व्यक्त करून  निवडणुकीदरम्यान पुन्हा येथे येणार असून तोपर्यंत महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबंधनाच्या माध्यमातून पक्ष बळकट करण्यात यावा.
ठाकरे यांचे आगमन होताच व्यासपीठावर तलवार व स्मृतीचिन्ह देऊन जिल्हाप्रमुख राजू कुथे, माजी आमदार रमेश कुथेंसह अन्य नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते सुभाष देसाई, संपर्क प्रमुख खासदार विनायक राऊत, आमदार नीलम गोऱ्हे, नरेंद्र भोंडेकर, आशिष जायसवाल, संजय राठोड, अशोक िशदे, खासदार कृपाल तुमाने, दीपक सावंत, प्रकाश जाधव, सतीश हरडे आदी उपस्थित होते. प्रास्तविक शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केले.
सभा रोखण्यासाठी काँग्रेसचे अडथळे
उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मैदान मिळू नये म्हणून येथील काँग्रेसच्या नेत्यांनी शहरातील सर्वच खासगी सभागृहे आणि मोठी मदाने आरक्षित करून ठेवली होती. त्यात इंदिरा गांधी स्टेडियमसह नगरपालिकेच्या मदानही होते. अखेर सुभाष शाळेचे मैदान मिळवण्यासाठी आपण पालिकेच्या सीओंना दूरध्वनी केल्यावर अवघ्या पाच मिनिटातच आमदार निवासातून मैदान बुकिंगसाठी दूरध्वनी करण्यात आला. जर पाच मिनिटे उशीर झाला असता तर आम्हाला हे मदान सुद्धा कॉंग्रेसने मिळू दिले नसते, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांनी भाषणात दिली.