“विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील, तर….” ; अजित पवारांचा इशारा!

शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, असंही बोलून दाखवलं आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

“शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील, तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही. ” असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमा कंपन्यांना दिला आहे.

“ विमा कंपन्यांनी त्याचं काम योग्य पद्धतीने करावंराज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसतेय त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी.” असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

“ज्या नुकसानीमुळे बळीराजाला, कष्टकऱ्याला पीक विमा मिळू शकतो, तो मिळाला पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे.” असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Deputy chief minister ajit pawar warns insurance companies msr

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या