निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. निवणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाला अधिकृतपणे शिवसेना म्हणून ओळख मिळालेली आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर ठाकरे गटाने आक्षेप व्यक्त केला आहे. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी तर निवडणूक आयोग, शिंदे गट तसेच भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह हे दडपशाही, दबाव, पैसा, सत्ता या माध्यमातून मिळवलं आहे. तसेच त्यासाठी गेल्या ५ महिन्यांत २ हजार कोटींचं पॅकेज वापरण्यात आलं, असा दावा राऊत यांनी केला आहे. राऊतांच्या याच आरोपाला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या आरोपांवर शेलक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (२१ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> “उद्धव ठाकरेंनी धमकीच दिली,” भगतसिंह कोश्यारींच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले, “माझ्या माहितीनुसार…”

Srikala Reddy Singh and her husband Dhananjay Singh
नवरा तुरुंगात, बायको निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत श्रीकला रेड्डी?
mla subhash dhote
प्रियंका गांधींच्या सभेला मैदान मिळू नये म्हणून… आमदार सुभाष धोटेंच्या आरोपाने खळबळ
Jayant Patil On Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानाला जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “बारामतीकर त्याच पद्धतीने…”
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

अशा निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ

“राजकारणात माणूस कधी वर जातो, कधी खाली जातो. मात्र इतकं निराश होऊन, मनात येईल ते बोलल्यामुळे लोक त्यांच्या बुद्धीची कीव करतात. त्यांच्या बोलण्याने काही होत नाही. मात्र लोकांना वाटतं, की आपण ज्यांना मोठे नेते म्हटलं तेच नेते संजय राऊतांसारखं निर्बुद्धपणे बोलतात. त्यामुळे अशा निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ,” अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हेही वाचा >>> ‘माझा विनायक मेटे करण्याचा डाव,’ अशोक चव्हाणांच्या आरोपानंतर प्रताप पाटील चिखलीकर आक्रमक; म्हणाले “त्यांनी…”

संजय राऊतांनी काय आरोप केला?

संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाने दबावाखाली येऊन शिवसेना तसेच धनुष्यबाणाबाबतचा निर्णय घेतला, असा दावा केला आहे. “निवडणूक आयोगाचा निर्णय एकतर्फी आणि ‘मेरी मर्जी’वाल्यांच्या मर्जीसाठी दिलेला निर्णय आहे. शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह हे दडपशाही, दबाव, पैसा, सत्ता यामाध्यमातून मिळवलं आहे. गेल्या ५ महिन्यांत २ हजार कोटींचं पॅकेज वापरण्यात आलं. याचे काय परिणाम होणार याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयात आम्ही धाव घेतली आहे,” असं राऊत म्हणाले.