काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा, गंभीर आरोप केला आहे. तसेच याचा विनायक मेटे करा, यालाही मेटेंसारखं संपवा, अशीही चर्चा सुरू आहे, असे चव्हाण म्हणाले आहेत. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यानंतर भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. अशोक चव्हाण यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. या आरोपांत काहीही तथ्य नाही, असे चिखलीकर म्हणाले आहेत.

मात्र आम्ही याची कधीही वाच्यता केलेली नाही

chavadi political situation in maharashtra ahead of lok sabha election diwali organized by political leaders
‘सत्ता खूप वाईट, नंतर कुणी चहा सुद्धा पाजत नाही’, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
Baban Gholap, Shinde group,
माजी मंत्री बबन घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप

“जो स्वत: कृती करतो त्याला भीती वाटणे साहजिकच आहे. गृहखात्याने सुरक्षा काढल्यामुळे ती पुन्हा मिळवण्यासाठीचा हा खटाटोप सुरू आहे. स्वत: मुख्यमंत्री असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संपवले पाहिजे अशा पद्धतीचे त्यांनी प्रयत्न केले. मात्र आम्ही याची कधीही वाच्यता केलेली नाही. अशोक चव्हाण यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. या आरोपात काहीही तथ्य नाही,” असे चिखलीकर म्हणाले.

सत्तेत केलेल्या कृत्यांची त्यांना आठवण होत असावी

“गृहखात्याने अनेक लोकांची सुरक्षा काढली. त्यांना सुरक्षा मिळवायची असेल तर खुशाल मिळवावी. केवळ सुरक्षा मिळावी म्हणून असे आरोप केले जात असतील, तर जनता माफ करणार नाही. असे केलेले आरोप म्हणजे स्वत: केलेल्या कृत्यांवर पांघरून घालणे होय. सत्तेत असताना त्यांनी केलेल्या कृत्यांची त्यांना आठवण होत असावी,” अशी टीका चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली.

समोरासमोर लढणारा मी कार्यकर्ता आहे

“मी अतिशय खानदानी माणूस आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. अशा प्रकारचे कृत्य करणे माझ्या रक्तात नाही. समोरासमोर लढणारा मी कार्यकर्ता आहे. पाठीत वार करणारी माझी खानदान नाही,” असेही प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले आहेत.

अशोक चव्हाण यांनी काय आरोप केले?

बोगस लेटरपॅडच्या अधारे अशोक चव्हाण मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. संबंधित आरोप करताना अशोक चव्हाणांनी कोणचंही नाव घेतलं नाही. पण संबंधित बोगस पत्र तयार करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यामागचा मूख्य सूत्रधार कोण आहे, हे शोधून काढलं पाहिजे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. ते नांदेड येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

याचा विनायक मेटे करा, यालाही मेटेंसारखं संपवा

“सध्या माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. अशोक चव्हाण कुठे चालले. गाडीने कुठे जातात, कुणाला भेटतात, यावर पाळत ठेवली जात आहे. याचा विनायक मेटे करा, यालाही मेटेंसारखं संपवा, अशीही चर्चा सुरू आहे,” असं खळबळजनक विधान अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

…म्हणून हा कार्यक्रम सध्या सुरू झाला

“पण जे कोणी हे सगळं करत आहे, त्यांना एवढंच सांगायचं आहे की, अशोक चव्हाणाचा जीव गेला तरी हरकत नाही, पण अशोक चव्हाण तुमच्या सारखा डुप्लीकेट आणि खोटं बोलून नेतृत्व करणारा नेता नाही. तुमच्यात नेतृत्व करण्याची जी चढाओढ चालली आहे, त्याबाबत आमची काहीही तक्रार नाही. आम्ही तुमचं नाव एकदाही घेत नाही. दुर्दैवाने माझ्यावर हा प्रसंग आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मी या घटनेचा उल्लेख करत आहे. पण हा प्रयत्न अतिशय केवीलवाणा आहे. लोकांची मनं जिंकता येत नाहीत. म्हणून हा कार्यक्रम सध्या सुरू झाला आहे, हे दुर्दैव आहे,” असंही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.