लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना राज्यात ीका आणि आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढली आहे. विरोधी बाकावरील राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे या तर गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेयत. फडणवीस हे गृहमंत्री म्हणून अयपशी ठरले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली आहे, असा अस सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच सुप्रिया सुळे यांनी ‘अबकी बार गोळीबार सरकार’ असे म्हणत भाजपा आणि फडणवीसांवर टीका केली. सुळे यांच्या याच टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसे उत्तर दिले. ते माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.

देवेंद्र फडणवीस यांचं सुप्रिया सुळेंना चोख उत्तर!

“मी सुप्रिया सुळे यांना एवढंच विचारको की, मावळचा गोळीबार झाला होता, तेव्हा सरकार काय होतं? राज्यातील ११३ गोवारांचा पोलिसांच्या लाठीचार्चमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता, तेव्हाचं सरकार काय होतं? सध्या सुप्रिया सुळे विरोधी पक्षाच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे त्या रोज असे विधानं करत आहेत,” असा पलटवार फडणवीस यांनी केला. तसेच सुप्रिया सुळेंची विधानं फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं खोचक विधानही त्यांनी केलं.

jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
Prime Minister Narendra Modi statement on terrorists
दहशतवाद्यांचा त्यांच्या भूमीतच खातमा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

“देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून चांगलं काम करायला हवं होतं. हर्षवर्धन पाटील यांच्यासह मदन बाफना यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांना धमकी दिली जात आहे. तुम्ही बघत आहात की सत्तेत असलेले आमदार गोळीबार करत आहेत. पोलीस ठाण्याच्या बाहेर येऊन गोळीबार केला जातोय. याला गृहमंत्रालय जबाबदार नाही का? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:चं काम चांगल्या पद्धतीने केलं असतं तर आम्हाला टीका करण्याची वेळच आली नसती. आता अबकी बार गोळीबार सरकार असं झालंय,” अशी खोचक टीका सुप्रिया सुळेंनी केली.

महायुती, महाविकास आघाडीत जागावाटपाला वेग

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यामुळेच सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आलाय. प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील वंचित बहुजन आघाडीची नाराजी आणि काही जागांसाठी चालू असलेला वाद, यावर नेमका तोडगा काय निघणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.