भाजपाकडे संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची दिलं. मी त्यांच्या या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. सत्ता स्थापनेच्या दाव्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची संधी दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले.

राज्याच्या विकासात फडणवीस आमच्यासोबत
भाजपाने आम्हाला साथ दिली. संख्याबळ असूनही त्यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला नाही. तर बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री पद दिलं. हा देवेंद्र फडणवीसांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. फडणवीस मंत्रीमंडळात नसले तरी आमच्या पाठीशी आहेत. राज्याच्या विकासात ते नेहमी आमच्यासोबत असतील असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुख्यमंत्रीपदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे असतील असे अंदाज बांधले जात होते. मात्र हे सर्व तर्क फोल ठरवत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. त्यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील असं जाहीर केलं आहे. आज संध्याकळी एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.