राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या वापराच्या मुद्द्यावरुन भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना खडेबोल सुनावले आहेत. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी सर्वपक्षीय आमदार हजर आहेत. नागपूरमध्ये सोमवारी फडणवीसांनी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात अनेक पदाधिकारी आणि आमदारांमध्ये निरुत्साह दिसत असल्याचा मुद्दा आपल्या भाषणात उपस्थित करत फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये एखाद्या ठराविक नरेटीव्हविरुद्ध लढाई लढण्यासाठी सोशल मीडियासारखे प्रभावी अस्त्र नाही असं अधोरेखित केलं. फडणवीसांनी, “मी जाणीवपूर्व आता जिल्हाध्यक्षांबद्दल बोलतोय. २१ व्या शतकामध्ये नरेटीव्हची लढाई करताना जर जिल्हाध्यक्षांचा प्रेझेन्स हा योग्य प्रकारे सोशल मीडियावर नसेल तर नरेटीव्हचा सामना कसा करणार?” असा प्रश्न फडणवीसांनी विचारला. फडणवीसांनी सोशल मीडियासंदर्भातील अहवाल पक्षातर्फे तयार करण्यात आला असल्याचंही पदाधिकाऱ्यांना सांगितलं. “आम्ही प्रत्येक कॅटेगरीचा अभ्यास केला. त्याचा अहवाल तुम्हाला पाठवणार आहे,” असं फडणवीस म्हणाले.

Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
chhagan bhujbal sharad pawar l
“शरद पवारांनी २०१४ च्या निवडणुकीवेळी…”, पटेलांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांचा आणखी एक गौप्यस्फोट
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

पुढे बोलताना फडणवीसांनी काही पदाधिकाऱ्यांनी उत्तम प्रेझेन्स तयार केल्याचं सांगत त्यांचं कौतुक केलं. मात्र काही आमदार सोशल मीडियावर अगदीच निष्क्रीय असल्याचं सांगताना नाराजी व्यक्त केली. “आपले काही काही कार्यकर्त्यांचा चांगला प्रेझेन्स तयार केलाय. छोट्या लेव्हलच्या काही पदाधिकाऱ्यांनी अतिशय उत्तम प्रेझेन्स तयार केल्याचं पहायला मिळत आहे. पण काही आमदार असे आहेत ज्यांच्या फेसबुकवर आठ-आठ दिवस पोस्ट नाही. तीन-तीन दिवस ट्वीटरवर पोस्ट नाही. असं कसं चालणार?” असा प्रश्न फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना विचारला.

नक्की वाचा >> Gram Panchayat Election Results: फडणवीस प्रचंड आशावादी! म्हणाले, “कोणी काहीही काळजी करु नका, लिहून घ्या की महाराष्ट्रात…”

“एवढ्या गोष्टी रोज होतात. त्यावर आपण अभिव्यक्त झालो नाही तर कशाप्रकारे आपण नरेटीव्हची लढाई लढणार?” असा प्रश्नही फडणवीसांनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्याचं महत्त्व समजावून सांगताना उपस्थित केला.