राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतमोजणीला सरुवात झाली आहे. रविवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. असं असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पदाधिकाऱ्यांबरोबर नागपूरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच बाजी मारणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधताना फडणवीसांनी भाजपाचा विजय होईल असं म्हटलं आहे. “उद्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आहे. मी आजच तुम्हाल सांगतो, लिहून घ्या तुम्ही की महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील. कोणी काहीही नरेटीव्ह केलं तरी आपल्याला रेकॉर्डब्रेक जागा मिळतील. कोणी काहीही काळजी करु नका,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Lok Sabha Election 2024
“भाऊ म्हणून मी पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेणार”, रोहित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “अजितदादा विसरले असतील, पण…”
lok sabha 2024, mahayuti, no Rebellion, maha vikas aghadi, keshav upadhye, bjp spokesperson, maharshtra politics, maharashtra, marathi news, politics news, ajit pawar ncp, eknath shinde shivsena, nashik, maharashtra news,
राज्यात महायुतीमध्ये बंडखोरी अशक्य – केशव उपाध्ये यांना विश्वास
What Aditya Thackeray Said?
“४० गद्दारांनी आता विचार करावा..”, आदित्य ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य
narayan rane
शिंदे गट भाजपवर नाराज! राणे यांच्या विधानांमुळे दुखावल्याची भावना, जागावाटपाचा तिढा कायम

नक्की वाचा >> फडणवीसांनी भाजपा आमदारांना झापलं; म्हणाले, “काही आमदार असे आहेत ज्यांच्या फेसबुकवर…”

“मागच्या वेळेस आम्ही सांगितलेलं की आमच्या एवढ्या ग्रामपंचायती आल्या. त्यांनी विचारलेलं कशावरुन आल्या? आमच्या बावनकुळेंनी नावासहीत यादी घोषित केली. तसेच त्या ठिकाणींहून आम्ही भाजपाचे पदाधिकारी आहोत, कार्यकर्ते आहोत असंही सांगितलं. त्यामुळे काही काळजी करु नका, पुन्हा एकदा जनता आपल्या पाठीशी उभी राहणार,” असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

नक्की वाचा >> Gram Panchayat Election 2022 Results: आज ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल! शिंदे-फडणवीस की मविआ? कोण मारणार बाजी?

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठीही रविवारी मतदान पार पडलं. यापैकी सर्वाधिक ग्रामपंचायती विदर्भातील होत्या. विदर्भात एकूण २२७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं असून आज कोण बाजी मारणार याबद्दल गावागावांमध्ये उत्सुकता आहे. विदर्भाबरोबरच सिंधुदुर्गमधील २९३, कोल्हापूरात ४३१, सोलापूरमध्ये १४१८, नागपूरात २३६ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये १९६, अहमदनगरमध्ये १९६५ आणि बीडमधील ६७० ग्रामपंचायतींचा निकालही आज जाहीर होत आहे.