सोलापूर : राष्ट्रपतींना निमंत्रण न देता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नव्या संसद भवनाचे उद्योगमंत्री होत असल्याचा निषेध करीत या संपूर्ण सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेणाऱ्या काँग्रेससह विरोधकांच्या भूमिकेवर उपमुख्यमंत्री फडणवीस तुटून पडले. विरोधकांचा हा शुध्द दुटप्पीपणा आहे. त्यांचा संविधान आणि लोकशाहीवर विश्वास नाही, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा >>> VIDEO: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांच्या भेटीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

गुरूवारी, सोलापुरात आले असता प्रसार माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी नव्या सःसद भवनाच्या उद्घाटनाच्या मुद्यावर भाजपेतर विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेचा कडक शब्दांत समाचार घेतला. एकीकडे अवघ्या तीन-चार वर्षात बांधलेल्या नवीन संसद भवनाचे जगभरात कौतुक होत असताना दुसरीकडे विरोधकांना  या देशाशी, लोकशाही आणि संविधानाविषयी काही देणेघेणे नाही. नवीन संसद भवन म्हणजे देशातील १४० कोटी जनतेच्या आस्थेचे मंदिर  आहे. ते नव्या भारताच्या शक्तीचे प्रतीक आहे. परंतु राष्ट्रपतींना निमंत्रण न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या नव्या संसद भवनाचे उद्घाटन होणे हे विरोधकांना सहन होत नाही. यात केवळ मोदीद्वेष आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंनी राजकारणात राहण्यावरच मुनगंटीवारांचं प्रश्नचिन्ह; म्हणाले, “…हा यांचा मूळ स्वभाव आहे!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशाच्या इतिहासात यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी आदींनी संसद  भवनातील अनेक्स वास्तुचे आणि ग्रंथालयाचे उद्घाटन केले होते. छत्तीसगढ विधानभवनाचा शिल्यान्यास केवळ खासदारपदावर असलेल्या सोनिया गांधी यांच्या हस्ते झाला होता. नितीशकुमार, ममता बॕनर्जी, के. चंद्रशेखर राव यांनी आपापल्या राज्यातील विधानभवनांतील नवनव्या वास्तुंचे उद्घाटन केले होते. त्यावेळी राष्ट्रपती वा राज्यपालांना का निमंत्रण दिले नव्हते, असा सवाल फडणवीस यांनी केला.