शिरपूर तालुक्यातील तोंदे गावातील विविध सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांच्या नावाने धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेतून बनावट कागदपत्र आणि स्वाक्षरी करून तब्बल ४२ लाख ९५ हजार रूपयांचा अपहार केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे एक एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत संशयित सुरेश पाटील आणि श्रीराम पावरा यांनी धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेतून तोंदे विविध सेवा सहकारी संस्थेतील ८६ सभासदांच्या नावाने कर्ज प्रकरणे तयार केली. कर्ज लागत असल्याचे भासवून बनावट सात-बारा, कागदपत्रे आणि तक्रारदारासह इतरांचीही स्वाक्षरी करून बँकेतून तब्बल ४२ लाख ९५ हजार ४८६ रुपयांचा अपहार केल्याची तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात दिलीप चौधरी यांनी दाखल केली. पोलिसांनी पाटील आणि पावरा या दोघांविरूध्द फसवणुकीचा आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jan 2016 रोजी प्रकाशित
बनावट कागदपत्रांच्या आधारे धुळे जिल्हा बँकेची फसवणूक
पोलिसांनी पाटील आणि पावरा या दोघांविरूध्द फसवणुकीचा आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 04-01-2016 at 00:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhule district bank fraud