सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल थेट हुकूमशाहीकडे होत असून ते पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास हुकूमशाहीमुळे कोणालाही त्यांच्या विरोधात बोलता येणार नाही. जो बोलेले, त्याला अटक होईल. मी तर मंत्री होतो. त्यामुळे प्रथम मलाच तुरुंगात जावे लागेल, असा भीतीयुक्त इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दिला आहे.

सोलापूर लोकसभा निवडणुकीत कोळी समाजाने काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्यानंतर विजापूर रस्त्यावरील माशाळ वस्तीत समाजाचा मेळावा पार पडला. त्यावेळी शिंदे बोलत होते. ते म्हणाले, दहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने मोठा विश्वास ठेवून आणि भूलथापांना बळी पडून त्यांच्या हाती सत्ता सोपविली होती. परंतु मोदी यांना आता सत्तेची चटक लागली आहे. यंदाची लोकसभा निवडणूक अधिक महत्वाची असून हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची ही लढाई असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – साताऱ्याच्या विकासाचं माझ्यावर सोडा, तुम्ही फक्त उदयनराजेंना निवडून द्या : अजित पवार

हेही वाचा – सोलापुरात कचरा आगारापाठोपाठ स्मार्ट सिटीच्या पाईप साठ्यालाही मोठी आग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीकास्त्र सोडले. लोकसभा निवडणुकीनंतर संभाव्य चौकशी टाळण्यासाठी सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करतील, असे भाकीत आंबेडकर यांनी सोलापुरात केले होते. त्यास प्रत्युत्तर देताना, प्रकाश आंबेडकरांचा बोलावता धनी कोण आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आपण मुलगी प्रणितीसह भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवा वारंवार पसरविल्या जातात. आमचा जन्म काँग्रेससाठी झाला आहे. आम्हाला काँग्रेसने घडविले आहे. आमच्या रक्तातच काँग्रेस आहे, असा दावा त्यांनी केला.