वाई :  सातारा जिल्हा कारागृहातील बंदीसाठी दैनंदिन कामकाजाकरिता आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप माणदेशी फाउंडेशन, म्हसवड संस्थेच्या वतीने करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल समवेत धर्मादाय आयुक्त सुभाष फुले उपस्थित होते. सातारा जिल्हा कारागृहासाठी आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यासंबंधी सातारा जिल्हा कारागृह अधीक्षक यांच्याशी चर्चा करून आवश्यक वस्तूंची माहिती घेतली. माणदेशी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती चेतना सिन्हा यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. सामाजिक कार्य करणाऱ्या चेतना सिन्हा यांनी बंदीजनासाठी धावून जाण्याचा निर्णय घेतला. कारागृहात आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना धर्मादाय आयुक्त म्हणाले की जर कारागृहातील कैद्यांना रोजगार उपलब्ध झाला, तर बाहेर आल्यानंतर ते उर्वरित आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतील. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी  कैद्यांना उद्देशून भाषण केले.  झाले गेले विसरून नवीन आयुष्याची सुरुवात चांगल्या प्रकारे करावी असे म्हणाले. श्रीमती चेतना सिन्हा म्हणाल्या, आज मला खूप आनंद होतोय कारण सर्वच बंदिजनांना योग्य ती मदत करण्याची संधी मिळत असून जणू काही एका बहिणीला आपल्या भावाची मदत करण्याची संधीचं मिळते आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.  

inquiry committee set up to investigate rto scam
परिवहन विभागातील घोटाळ्याच्या तपासासाठी चौकशी समिती स्थापन
BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा

माणदेशी फाऊंडेशन ही एक सामाजिक संस्था असून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या ठिकाणी कार्यरत आहे. ज्यामधून महिलांना यशस्वी उद्योजिका बनविण्याचे कार्य केले जात आहे. संस्थेने कोविडच्या काळात मास्क, सॅनिटायझर, पी.पी.ई. कीट तसेच जीवनावश्यक वस्तूंचे मोठय़ा प्रमाणावर वाटप केले असून कोविड पीडितानां ऑक्सिजन मशीन, मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. शिवाय या पूर्वीही पुणे येथील येरवडा कारागृहातील बंदिणी महिलांना व्यवसाय प्रशिक्षण दिले आहे. त्याचा लाभ असंख्य कैद्यांनी घेतला. आकांक्षा चेतना सिन्हा यांनीही सातारा येथील कारागृहातील मदत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले. यावेळी कारागृह अधीक्षक ज्ञानेश्वर दुबे, अ‍ॅड. डी. व्ही. कुंभार, माणदेश फाऊंडेशनच्या कार्यकारी अध्यक्ष रेखा कुलकर्णी, अपर्णा सावंत व रवी विरकर, रेश्मा काटकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारागृहाच्या बंदिणी विभाग प्रमुख तेजश्री पोवार यांनी केले.