Maharashtra HSC 12th Result 2019 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेच्या निकालाविषयी अनेकांनाच धाकधूक असते अपयशाची भितीसुद्धा. शैक्षणिक परीक्षांमध्ये नापास झाल्यास पुढे करिअर कसं करणार आणि त्यात यशस्वी होणार का ही चिंता अनेकांनाच लागून राहिली असते. पण जर अथक परिश्रम घेत राहिलात तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही
बारावीनंतरही पदवी स्तरावर मुले नापास होतात, पण त्याचीही फारशी चर्चा होत नाही. समाजाच्या दृष्टीने पास-नापास हा प्रश्न मुख्यतः १०वी व त्याखालोखाल १२वी या परीक्षांपुरताच मर्यादित आहे असे दिसते. आपल्याकडे नापास होणाऱ्या मुलांची अवस्था वाईट असते. त्यांना कोणीच वाली नसतो. शिक्षक तर सोडाच, पण आई-वडीलही त्यांना पाठीशी घालत नाहीत. अशा मुलांनी खचून जाऊ नये. दुसरी संधी असतेच..अपयशामुळे आत्महत्या करण्याचा विचार तर डोक्यात आणूच नये.
सचिन तेंडूलकर, विराट कोहली, सलमान खान यांच्याराखे दिग्गज तरी कुठे उच्चशिक्षीत आहेत. तरीही आज ते स्वत:च्या हिंमतीवर यशाच्या शिखरावर पोहचले आहेत. अपयशाने खचून न जाता शांत डोक्यानं विचार करा. आयुष्यातील ही काही अखेरची संधी नव्हती. पालकांनी नापास पाल्यावर न चिडता विश्वासात घ्यावे. त्याची समजूत काढावी. जर पाल्याला मानसिक त्रास जास्त होत असेल आणि आत्महत्या करेल असे वाटत असेल तर त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जावे.