‘व्याख्याता’ पदासाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेसाठी (सेट) गेल्या परीक्षेच्या तुलनेत दुप्पट विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी १७ फेब्रुवारी २०१३ ला सेट घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ३१ डिसेंबपर्यंत मुदत देण्यात आली होती, तर ८ जानेवारी २०१३ पर्यंत अर्जाची छापील प्रत परीक्षा केंद्रावर जमा करण्यासाठी मुदत देण्यात आली होती.
या परीक्षेसाठी एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यभरात १३ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. एक वर्षांनंतर सेट होत असल्यामुळे यावेळी विद्यार्थ्यांकडून परीक्षेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय या वेळी प्रथमच नव्या पॅटर्ननुसार सेट होणार आहे.
 या वेळी नेट प्रमाणेच सेटचा तिसरा पेपर वैकल्पिक असणार आहे. त्यामुळे या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doubled applications for set exam
First published on: 09-01-2013 at 03:26 IST